नगर जिल्ह्यात यंदा ऊसगाळप हंगाम जोरात - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, April 5, 2021

नगर जिल्ह्यात यंदा ऊसगाळप हंगाम जोरात

 नगर जिल्ह्यात यंदा ऊसगाळप हंगाम जोरात

  वांबोरी (ता-राहुरी) च्या प्रसाद शुगर्स ने यंदा आपली गाळप क्षमता वाढवल्याने सात लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे. यात व्यवस्थापनाचे लक्ष असून ऊसउत्पादकांनी प्रसाद शुगरला चांगला प्रतिसाद दिला आहे, हंगाम आणखी काही दिवस चालेल.
- सुशील कुमार देशमुख,
कार्यकारी संचालक, प्रसाद शुगर (वांबोरी)



राहूरी ः
राहुरी तालुक्यात आजअखेर विक्रमी तब्बल साडेबारा लाख मेट्रिक टन ऊस उत्पादित झाला असून तालुक्यातील दोन कारखान्यांसह विविध साखर कारखान्यांनी आपापल्या कारखान्यात ऊस गाळप केला आहे.ऊसतोडणी हंगाम आता अंतिम टप्प्यात असून लाखभर मे.टन ऊस अजूनही शिल्लक आहे.

   नगर जिल्ह्यात यंदा ऊसगाळप हंगामात भरपूर उपलब्ध झाला. राहुरी तालुका हे उसाचे आगार समजले जाते.यंदा साखर कारखान्यांनीही आपली क्षमता वाढवल्याने मजुरांच्या टोळ्याही वाढवल्या. यापूर्वी राहुरी तालुक्यात बाहेरील साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात मुबलक ऊस उपलब्ध असल्याने बर्‍याच कारखान्यांनी राहुरीकडे उसासाठी पाठ फिरवली .दिवाळी झाल्यानंतर ऊसतोडणीसाठी हंगाम सुरू झाला.राहुरी तालुक्यातही तोडण्या वाढल्या . गत पाच महिन्यात राहुरी तालुक्यातील सुमारे साडे बारा लाख मेट्रिक टन ऊस उत्पादीत झाला असून त्याचे विविध साखर कारखान्यांनी तोडून आपापल्या कारखान्यात गाळप केला आहे. वांबोरी येथील राज्यमंत्री ना.प्राजक्त तनपुरे यांच्या अधिपत्याखालील व कार्यकारी संचालक सुशिलकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसाद शुगर्स कारखान्याची गाळपक्षमता वाढवली आहे.प्रसाद शुगर्सने 6 लाख 25 हजार मेट्रिक टन ऊस गाळप पूर्ण केले आहे, तर यापोटी 6 लाख 34 हजार क्विंटल साखर उत्पादन केले आहे. साखर उतारा 10.14 इतका आला आहे. प्रसाद शुगर्स चा गाळप हंगाम सध्या अंतिम टप्प्यात असून साडेसहा लाख मॅट्रिक टनाहून अधिक ऊसगाळप करणार आहे. ऊसतोडणी कार्यक्रमाकडे कारखाना व्यवस्थापन लक्ष ठेवून आहे. माजी खा.प्रसाद तनपुरे, का. संचालक सुशिलकुमार देशमुख, संचालक सुरेश बाफना यांनी लक्ष घातले आहे. याशिवाय राहुरी फॅक्टरी येथील डॉ. तनपुरे साखर कारखान्याने आजअखेर 2 लाख 10 हजार मे टन उसगाळप करीत 1 लाख 84 हजार क्विंटल साखर उत्पादन केले आहे. खा. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष नामदेवराव ढोकणे, उपाध्यक्ष श्यामराव निमसे व संचालक मंडळ यांनी ऊस गाळप हंगाम यशस्वी करण्यासाठी लक्ष घातल्याचे चित्र आहे. यंदा तनपुरे कारखान्याला अनेक अडचणींना सामना करावा लागला तरीही हंगाम यशस्वीतेसाठी व्यवस्थापन प्रयत्न करत आहे. राहुरी तालुक्यातील ऊसतोडणीसाठी विविध साखर कारखान्यांच्या टोळ्या कार्यरत होत्या. तालुक्यातील उसउत्पादक शेतकर्‍यांनी जवळपास 4 -5 लाख मेट्रिक टन ऊस बाहेरच्या साखर कारखान्यांना दिला असल्याचा अंदाज साखर उद्योग वर्तुळात व्यक्त केला जात आहे. राहुरी तालुक्यात सध्या एक त दिड लाख मे. टन ऊस उपलब्ध असल्याचा अंदाज आहे.

No comments:

Post a Comment