घर आगीत जळूनखाक झालेल्या वडीतके कुटुंबाला सौ. तनपुरे यांची भेट - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, April 1, 2021

घर आगीत जळूनखाक झालेल्या वडीतके कुटुंबाला सौ. तनपुरे यांची भेट

 घर आगीत जळूनखाक झालेल्या वडीतके कुटुंबाला सौ. तनपुरे यांची भेट


नगरी दवंडी/प्रतिनिधी

राहुरी ः राहुरी तालुक्यातील चिंचाळे गावामधील  श्री. गुजाबा वडीतके यांचे घर आगी मध्ये पूर्ण पणे जळून गेल्याने श्री वडितके ह्यांचा प्रपंच उघड्यावर पडल्याची घटना समजताच राज्यमंत्री प्राजक्तदादा तनपुरे यांनी तातडीने वडीतके कुटुंबाला मदत घेऊन  त्यांच्या पत्नी सौ सोनालीताई तनपुरे व नगरसेविका सौ संगीता आहेर  ह्या घटना स्थळी पाठवले. सदर घटनेची पाहणी करुन त्यांनी घर जळीत झालेल्या  वडीतके कुटुंबाला भेट दिली व त्यांना  आर्थिक व  मानसिक आधार दिला.
   यावेळी  कामगार पोलिस पाटील भागवत टेंगळे, घमाजी जाधव ग्रा सदस्य, सखाराम तिखुले सरपंच, सतिष बाचकर ग्रा.सदस्य, ऋषी टेंगळे राष्ट्रवादी शाखा अध्यक्ष, दामू काळे, मा.ग्रा.सदस्य,दत्तू आघाव, तसेच ग्रामपंचायत चिंचाळे व गडधे आखाडा ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment