भारतीय लष्करातील सुभेदार मेजरपदी लोणी हवेली गावचे सुपुत्र विठ्ठल कोल्हे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, April 5, 2021

भारतीय लष्करातील सुभेदार मेजरपदी लोणी हवेली गावचे सुपुत्र विठ्ठल कोल्हे

 भारतीय लष्करातील सुभेदार मेजरपदी लोणी हवेली गावचे सुपुत्र विठ्ठल कोल्हे


नगरी दवंडी/प्रतिनिधी

पारनेर ः पारनेर तालुक्यातील लोणी हवेली गावचे सुपुत्र विठ्ठल कोंडीबा कोल्हे यांना भारतीय लष्करातील अत्यंत उच्च स्थानाची मानली जाणारी सुभेदार मेजर ही पदस्थापना बॉम्बे इंजीनियरिंग ग्रुप पुणे या ठिकाणी आज मिळाली. भारतीय लष्करामध्ये 30 वर्षा पुर्वी अत्यंत साधा सैनिक म्हणून सेवेला सुरूवात केलेले श्री विठ्ठल कोल्हे यांनी आजपर्यंत 16 वेळा वेगवेगळ्या पदावर काम करून परदेशात लेबनॉन कंबोडिया या ठिकाणी प्रशिक्षण घेतले आहे तसेच भारतीय पॅरा जंपिंग हे अत्यंत खडतर प्रशिक्षण/सेवा बजावलेली आहे. कोल्हे यांच्याकडे बास्केट बॉल प्रशिक्षण म्हणून 9वर्ष जबाबदारी पारपाडली आहे. विठ्ठल कोल्हे यांनी अत्यंत घडतर, बिकट आणि जिद्दीने  प्रयत्न करत- करत सुभेदार मेजर या पदाला गवसनी घातली आहे.  लोणी हवेली परिवाराच्यादृष्टीने अत्यंत अभिमानाची बाब आहे. त्यामुळे परिवाराच्या वतीने कोल्हे साहेबांचे लोणी हवेलीचे सरपंच जान्हवी दुधाडे , माजी सरपंच श्री लहुअण्णा कोल्हे उपसरपंच अमोल दुधाडे, माजी उपसरपंच संजय कोल्हे मेजर, प्राध्यापक संजय कोल्हे  सुभाष राणू कोल्हे ग्रामपंचायत सदस्य श्री शिवाजी थोरे , श्री अशोक कोल्हे , सौ सिमा कोल्हे , तंटामुक्ती अध्यक्ष लिंबराज दाते ,दादाभाऊ कोल्हे गुरूजी,बाळासाहेब जाधव ,संभाजी थोरे ,बाजीराव दुधाडे ,दादा ठाणगे,शिवाजी कोल्हे ,जयसिंग बाबुजी ,अशोक दुधाडे , सागर हिंगडे ,किसन दुधाडे गुरुजी यांनी अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here