खावटी योजनेतून आदीवासींना 73 लाख 32 हजार रूपये मंजूर ः आ. नीलेश लंके - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, April 7, 2021

खावटी योजनेतून आदीवासींना 73 लाख 32 हजार रूपये मंजूर ः आ. नीलेश लंके

 खावटी योजनेतून आदीवासींना 73 लाख 32 हजार रूपये मंजूर ः आ. नीलेश लंके

1 हजार 833 लाभार्थ्यांना होणार लाभ

नगरी दवंडी/प्रतिनिधी

पारनेर ः आदीवासी समाजाला आर्थिक लाभ देणार्‍या राज्य शासनाच्या खावटी योजनेचा पारनेर - नगर मतदार संघातील 1 हजार 833 लाभार्थ्यांना लाभ होणार असून त्यासाठी 73 लाख 32 हजार रूपयांचा निधी मंजुर करण्यात आल्याची माहीती आमदार नीलेश लंके यांनी दिली.
   भाजपा सरकारने आदीवासी समाजासाठी आलेली ही योजना बंद केली होती. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर ही योजना मागील वर्षीपासून पुन्हा सुरू करण्यात आली.या योजनेचा मतदार संघातील आदीवासी बांधवांना लाभ मिळावा यासाठी आ.लंके यांनी पाठपुरावा केला होता.त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यावर दोन हजार रूपयांचा पहिला हप्ता वर्ग होणार आहे.
   राज्य शासनाने ही योजना सुरू केल्यानंतर मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला.आदीवासी समाजालाही त्याचा मोठा फटका बसला.खावटी योजनेच्या माध्यमातून आदीवासींच्या पदरात काहीतरी पडावे यासाठी आ. लंके यांनी मंत्रालय स्तरावर पाठपुरावा केला.त्यांच्या या पाठपुराव्यास यश आल्याने आदीवासी बांधवांनी आनंद व्यक्त केला आहे.
राज्य शासनाच्या आदीवासी बांधवांच्या उथ्थानासासाठी अनेक योजना आहेत.या योजनाही मतदार संघात राबविण्यासाठी आ.लंके यांनी विविध प्रस्ताव सादर केले आहेत. त्यापैकी काही योजनांचा निधी मंजुर होऊन प्रत्यक्ष कामांनाही सुरूवात झाली आहे. वैयक्तीक लाभाच्या योजनाही आदीवासींच्या घरापर्यंत पोहचविण्या साठी आपण कटीबद्ध असल्याचे आ.लंके यांनी सांगितले.
   या कामी श्री.गणेश मधे, पुनाजी मधे, पोपट मेंगाळ, मनोज चिकणे, धोंडीभाऊ मधे,राजू केदार, बाळू बर्डे  अण्णा मधे , संदीप केदारे यांनी आ. लंके आदीवासी समाजासाठी या योजनेचा लाभ मिळवून दिल्याबददल आभार माणले. व आ. लंके यांनी आदीवासी समाजासाठी या योजनेचा लाभ मिळवून दिल्याबददल आभार मानले.

No comments:

Post a Comment