पारनेर ग्रामीण पतसंस्थेला 3 कोटी 10 लाख रुपये नफा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, April 5, 2021

पारनेर ग्रामीण पतसंस्थेला 3 कोटी 10 लाख रुपये नफा

 पारनेर ग्रामीण पतसंस्थेला 3 कोटी 10 लाख रुपये नफा

चेअरमन काशिनाथ दाते सर यांची माहिती...

नगरी दवंडी/प्रतिनिधी

पारनेर ः पारनेर ग्रामीण पतसंस्थेला सन 2020 - 2021 या आर्थिक वर्षात रु.3 कोटी 10 लाख रुपयांचा ढोबळ नफा झाला आहे अशी माहिती श्री काशिनाथ दाते सर, संस्थापक चेअरमन तथा सभापती कृषी व बांधकाम समिती, जिल्हा परिषद, अहमदनगर यांनी दिली. संस्थेच्या ठेवी मार्च 2021 अखेर 155 कोटी 51 लाख रुपयांच्या ठेवी आहेत. संस्थेचे खेळते भागभांडवल 176 कोटी 73 लाख आहे. वसुल भागभांडवल 4 कोटी 74 लाख व इतर निधी 13 कोटी 87 लाख आहे, संस्थेचे कर्ज वाटप 124 कोटी 45 लाख असुन बँक शिल्लक व गुंतवणुक रु.44 कोटी 25 लाख आहे. संस्थेची वार्षिक उलाढाल रुपये 1600 कोटींची झालेली आहे. आर्थिक वर्षात संस्थेच्या ठेवींमध्ये 17 कोटी 93 लाख व कर्जामध्ये 34 कोटी 76 लाख वाढ झालेली आहे. असे संस्थेचे व्हा. चेअरमन बाळासाहेब सोबले यांनी सांगितले. संस्थेने अठरा वर्षाच्या कालावधीत गोरगरीब गरजू घटकांना तसेच सुशिक्षित बेरोजगार, शेतकरी, लघुउद्योग, होतकरु कामगार यांना आर्थिक प्रगती करता यावी यासाठी पतसंस्थेच्या माध्यमातून कर्ज वितरण करुन आर्थिक विकास करण्याचा प्रयत्न केला आहे.
   संस्थेने सतरा वर्षाच्या कालावधीत पारनेर टाकळी ढोकेश्वर जामगांव व कामोठे (नवी मुंबई), खडकवाडी, आळेफाटा, सुपा व शिरुर येथे स्वमालकीच्या प्रशस्त व अद्ययावत इमारती आहेत. पारनेर, टाकळी ढोकेश्वर. अळकुटी, बेलवंडीफाटा, जामगांव, नारायणगव्हाण आळेफाटा, ता. जुन्नर, सुपा, कामोठे, नवी मुंबई, वनकुटे, अहमदनगर, ढवळपुरी, भोसरी, खडकवाडी, मांडवेखुर्द, पळशी व शिरुर अशा सतरा शाखा कार्यरत आहेत. संस्थेचे कार्यक्षेत्र अहमदनगर, पुणे, ठाणे व मुंबई आहे. संस्थेमार्फत पारनेर, टाकळी ढोकेश्वर, अळकुटी व जामगांव, ढवळपुरी व बेलवंडीफाटा येथे सभासदांना लॉकर सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. संस्थेच्या अद्यावत कोअर बँकींग, मोबाईल बँकींग, एस.एम . एस. सुविधामुळे ग्राहकांना सर्व माहिती तात्काळ मिळत आहे. तसेच संस्थेच्या सर्व शाखांमध्ये महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे अधिकृत वीज बील भरणा केंद्र, आर.टी.जी.एस व एन.ई. एफ.टी सुविधा सुरु करण्यात आल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष थोरात यांनी सांगितले.
   पारनेर ग्रामीण सहकारी पतसंस्थेच्या अहमदनगर, पुणे व मुंबई जिल्ह्यातील सर्व शाखा प्रगतीपथावर आहेत. सद्य स्थितीला कोरोना व्हायरस मुळे सभासद, ठेवीदार, कर्जदार व कर्मचारी यांना संसर्ग होऊ नये यासाठी संस्थेने विविध उपाययोजना केलेल्या आहेत.

No comments:

Post a Comment