तरुणांनी राहुल रसाळचा आदर्श घेवून सुधारीत शेती करावी- आ. निलेश लंके - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, April 5, 2021

तरुणांनी राहुल रसाळचा आदर्श घेवून सुधारीत शेती करावी- आ. निलेश लंके

 उद्यानपंडीत राहुल रसाळला आण्णा हजारेंकडून शब्बासकी!

तरुणांनी राहुल रसाळचा आदर्श घेवून सुधारीत शेती करावी- आ. निलेश लंके

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

पारनेर ः पारनेर तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून सर्वश्रुत आसतना तालुक्याचा एक उमदा तरूण कृषी पदवीका घेऊन देशासह परदेशात पारनेरचा झेंडा फडकवतोय हा तालुक्याचा बहुमान आहे.आसे जेष्ठ समाजसेवक पद्मभुषण आण्णासाहेब हाजारे यांनी राहुल रसाळच्या कृषी कार्याचे कौतुक केले.
   शेती क्षेत्रात सुधारीत शेती तंत्रज्ञानाच्या माध्यमातुन शेतीकडे दुर्लक्ष करणार्‍या अधुनिक तारुणाईत एक उच्च कृषी पदवीधारक तरुण श्री.राहुल अमृता रसाळ हा शेती क्षेत्रात झोकुन देत पारनेर तालुक्यातील निघोज येथे अधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर करत आदर्शवत शेतकरी म्हणून आजवर अनेक कृषी पुरस्काराचे मानकरी झालेले आहेत. त्यांच्या सुधारीत शेती तंत्र ज्ञानाची दखल घेत महाराष्ट्र शासन कृषी विभागा मार्फत 2019 चा उद्यानपंडीत पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल जेष्ठ समाजसेवक पद्मभुषण आदरणीय आण्णासाहेब हजारे यांनी श्री.राहुल रसाळ यांचे तोंड भरून कौतुक करत त्यांचा राज्याची ग्रामपंढरी समजली जाणार्‍या राळेगण सिद्धी येथे सन्माण करत त्यांचे भरभरून कौतुक करून शुभेच्छा दिल्या. द्राक्ष बागेची लागवड ते युरोपला द्राक्षाची निर्यात या प्रक्रियेची संपुर्ण माहिती आण्णांनी जाणून घेतली.व युवा शेतकरी राहुल रसाळ यांचे अभिनंदन केले.यावेळी मा.सरपंच जयसिंग मापारी, दत्ता आवारी, मा.ऊपसरपंच लाभेष औटी, संकेत लाळगे, नाना आवारी आदी यावेळी सदर सन्मान सोहळ्यास हजर होते.
   नौकरी व्यवसायाच्या हव्यासापायी तरुण वर्ग हा शेती पासुन दुर जात आहे.व शेती व्यवसायाचा तिरस्कार करत आसताना राहुल आम्रुता रसाळ या उच्चशिक्षीत कृषी पदवीधर तरुणानी कृषी क्षेत्रात घेतलेली गरुडझेप म्हणजे तालुक्याचा गौरोव आहे. तरुणांनी नौकरीच्या मागे न लागता श्री. राहुल रसाळ यांचा आदर्श घेऊन कृषिक्रांती करावी असा संदेश पारनेर नगर तालुका विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी उच्चशिक्षित तरुणांना दिली व नुकत्याच जाहीर झालेल्या कृषी क्षेत्रातील सर्वच्च समजला जानारा महाराष्ट्र शासनाचा उद्यान पंडित पुरस्काराचे मानकरी ठरलेले श्री.राहुल रसाळ यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना भावी सुधारित शेतीच्या व आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृषी क्रांती करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here