खासदार सुजय विखे यांच्या निधीतून वराळ जनसेवा फौंडेशनला रुग्णवाहिका - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, April 7, 2021

खासदार सुजय विखे यांच्या निधीतून वराळ जनसेवा फौंडेशनला रुग्णवाहिका

 खासदार सुजय विखे यांच्या निधीतून वराळ जनसेवा फौंडेशनला रुग्णवाहिका

निघोज येथे रुग्णवाहिकेचे विखे यांच्या हस्ते भूमिपूजन


नगरी दवंडी/प्रतिनिधी

पारनेर ः रूग्ण सेवा ही ईश्वर सेवा असून सेवाभावी कामांच्या माध्यमातून संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनने निघोज आळकुटी जिल्हा परिषद गटात सामाजिक कामांच्या माध्यमातून चांगले काम केले असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील यांनी व्यक्त केले आहे. खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील यांनी खासदार निधीतून संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनला रुग्णवाहिका दिली या रुण्गवाहीकेचे पूजन सरपंच चित्राताई सचिन वराळ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते.सभापती गणेश शेळके, राहुल शिंदे, भाजपचे माजी तालुका अध्यक्ष विश्वनाथ कोरडे, डॉ सुनिल कदम, डॉक्टर बाळासाहेब घोगरे, विक्रम वराळ, डॉ पांडुरंग थोरात , डॉ जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ रोहिणी डोणे आदी तसेच विविध संस्थांचे अधिकारी पदाधिकारी संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे सदस्य, संदीप पाटील युवामंचचे सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.खासदार विखे पाटील यावेळी म्हणाले राजकारण करण्यापेक्षा सामाजिक कामांना प्राधान्य देणे गरजेचे आहे.
   कोरोना काळात संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनने घरपोच किराणा, भाजीपाला व औषध तसेच लोकपयोगी वस्तू स्वस्त दरात उपलब्ध करून शिवाय घरपोहोच करीत लॉकडाउन काळात देउन जनतेला मोठ्या प्रमाणात पाठबळ दिले आहे रात्री अपरात्री कधीही फोन आला तरी सचिन पाटील वराळ व त्यांचे सहकारी रुण्गाला वैद्यकीय सुविधा तातडीने मिळण्यासाठी प्रयत्नशील असतात.संदीप पाटील वराळ यांनी दहा वर्षात जो सेवाभाव केला तोच सेवाभाव गेली चार वर्षात संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे सदस्य करीत आहेत गेली सहा वर्षांपासून हजारो कुटूंबांना दिवाळीचा आनंद देण्यासाठी लोकसहभागातून काम केले आहे अशाप्रकारे रुण्ग सेवा ही ईश्वर सेवा या उद्देशाने काम करणारे हे कार्यकर्ते असल्याने त्यांना आपण खासदार निधीतून रुग्णवाहिका दिली असून समाजसेवेच्या माध्यमातून ते चांगले काम करतील अशी ग्वाही खासदार डॉ विखे पाटील यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here