सेनेचे दोन्ही पदाधिकारी सत्तेचा सद्उपयोग करत आहेत ः ना.विजय औटी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, April 5, 2021

सेनेचे दोन्ही पदाधिकारी सत्तेचा सद्उपयोग करत आहेत ः ना.विजय औटी

 सेनेचे दोन्ही पदाधिकारी सत्तेचा सद्उपयोग करत आहेत ः ना.विजय औटी

तालुक्यामध्ये अधिकची विकास कामे करण्याचा मनोदय : दाते

नगरी दवंडी/प्रतिनिधी

पारनेर ः पारनेर तालुक्यातील वडनेर बु.॥ येथील वाजेवाडीमधे अहमदनगर जिल्हापरीषदेचे बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशिनाथ दातेसर यांच्या जनसुविधा योजने अंतर्गत व शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले यांचे प्रयत्नामधुन मंजुर झालेल्या, खारवढा येथील बंधार्यासाठी 14 लक्ष 98 हजार व स्मशानभूमीसाठी 13 लक्ष 50 हजार रुपये अशा एकुण 28 लक्ष 48 हजार रुपयांच्या कामाचे भूमीपुजन महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी यांचे शुभहस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काशिनाथ दातेसर हे होते.याप्रसंगी बोलताना विजयराव औटी म्हणाले, अहमदनगर जिल्हा परीषदेच्या बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशिनाथ दातेसर व पारनेर पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके हे सेनेचे दोन्ही पदाधिकारी शिवसेनेने दिलेल्या सत्तेचा योग्य सद्उपयोग करताना दिसताहेत, त्यामुळे माझ्या मनाला समाधान वाटत असल्याचे सांगीतले.तालुका विकासाच्या माध्यमातुन पुढे न्यायचा हि संकल्पना मागील 15 वर्ष आमदार असताना या तालुक्यामधे रुजवली.अगोदर सेनेच्या कार्यकर्त्यांवर चांगले संस्कार केले,त्याला कुठेतरी आज फळ येताना दिसत असल्यामुळे माझ्या मनाला निश्चितच समाधान वाटत आहे.सेनेचे जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले, तालुका प्रमुख विकास रोहोकले, युवासेना तालुकाप्रमुख नितीन शेळके,महीला आघाडीच्या कार्यकर्त्या खुप चांगले काम करत आहेत.त्यांच्या कामाचा आढावा राज्य कोरोनाच्या संकटामधुन बाहेर पडल्यावर मी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना देणार असुन,त्यामधे आतापर्यंत पदाधिकार्यांनी केलेल्या कामाची माहीती देणार आहे.त्यामधे हे दोन्ही पदाधिकारी व संघटनेचे कार्यकर्ते यांच्या कामाचा समावेश असणार असल्याचे सांगत त्यांनी तुम्ही सर्व पदाधिकारी अभानंदनास पात्र असल्याचे विजयराव औटी म्हणाले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरुन बोलताना काशिनाथ दाते म्हणाले,आमचे नेते आणि राज्य विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी यांच्या मार्गदर्शना खाली पारनेर तालुक्यामधे मोठ्या प्रमाणात विकासकामे आम्ही करत आहोत.भविष्यामधे तालुक्यामधे अधिकची विकास कामे करण्याचा मनोदयही दाते यांनी व्यक्त केला.याप्रसंगी शिवसेनेचे तालुका प्रमुख विकास रोहोकले,माजी उपतालुका प्रमुख रमेश वरखडे,युवासेना तालुका प्रमुख नितीन शेळके,सरपंच राहुल सुकाळे,उपसरपंच पुनम खुपटे,शिवाजी सुकाळे,पांडुरंग येवले,रमेश वाजे,सुरेखा येवले, अनिल नर्हे,आशाबाई चौधरी, विकास वाजे,आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment