म्हसोबाझाप ग्रामपंचायतीने मांडला राज्यातील पहिला अर्थसंकल्प ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, April 1, 2021

म्हसोबाझाप ग्रामपंचायतीने मांडला राज्यातील पहिला अर्थसंकल्प !

 म्हसोबाझाप ग्रामपंचायतीने मांडला राज्यातील पहिला अर्थसंकल्प !

अंदाजपत्रक तब्बल 1 कोटी 27 लाखांचे; नवनिर्वाचित सरपंच प्रकाश गाजरे यांची माहिती
पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून म्हसोबा झाप ग्रामपंचायत मध्ये विकासाच्या योजना टप्प्याटप्प्याने राबविणार गावचा राहिलेला विकासाचा आलेख भरून काढणार. ग्रामीण भागात विकासात्मक पातळीवर काम करून गावचा विकासाच्या माध्यमातून चेहरामोहरा बदलणार  गावातील पाणी, रस्ते, वीज, शिक्षण या मूलभूत सुविधा सोडवण्यासाठी प्रामुख्याने भर देणार. - प्रकाश गाजरे
                                                                        -  नवनिर्वाचित सरपंच, म्हसोबा झाप


नगरी दवंडी/प्रतिनिधी

पारनेर ः तालुक्यातील म्हसोबा झाप ग्रामपंचायतीने यंदाच्या आर्थिक वर्षात 1 कोटी 27 लाख रूपयांचे वार्षिक अंदाजपत्रक सरपंच प्रकाश गाजरे यांनी सादर केले. वार्षिक अर्थसंकल्पामध्ये रंगदास स्वामी देवस्थान विकास, शाळांना शुद्ध आणि मुबलक पाणी, रस्ते, पथदिवे, सभामंडप, काँक्रीट रस्ते, गटार व्यवस्था, महिला सबलीकरण, पाणीपुरवठा, अंगणवाडी बांधणी, सुशोभिकरण, यासाठी भरीव  तरतूद करण्यात आली. अशा प्रकारचा अर्थसंकल्प मांडणारी ही ग्रामपंचायत राज्यात अव्वल ठरली आहे.
   अंदाजपत्रकात रंगदास स्वामी मंदिर सुशोभिकरण करणे पेव्हर ब्लॉक बसविणे 5 लक्ष रुपये, शौचालय युनिट बांधणे 2.23 लक्ष, जि. प्र. प्रा. शाळा गाजरे झाप, गुरेवाडी, भोरवाडी, भोसर माळ, शिंदेवाडी फाटा, गाढवेझाप कन्हेर शाळांना शुद्ध व मुबलक पाणी पुरवठा साठी प्रत्येकी 3 लाख रुपये प्रमाणे 21 लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली. गावातील ग्रामदेवतांना सर्व सभा मंडप बांधणे, कन्हेर येडूआई सभा मंडप बांधणे  4.50 लक्ष, शिंदेवाडी फाटा सभामंडप बांधणे 5 लक्ष रुपये, गुरेवाडी दुर्गा माता सभा मंडप बांधणे 10 लक्ष रुपये, गाजरेझाप श्रीकृष्ण मंदिर सभा मंडप बांधणे 10  लक्ष रुपये, कन्हेर मारुती मंदिर सभा मंडप बांधणे 5 लक्ष रुपये, बन वस्ती गणेश मंदिर सभा मंडप बांधणे 5 लक्ष रुपये, भोसर माळ सभामंडप आणि 5 लक्ष  रुपये, वाळुंज झाप मोरेश्वर मंदिर सभा मंडप बांधणे 5 लक्ष रुपये, सभा मंडप बांधणे साठी एकूण 49.50 लक्ष रुपये एवढी भरीव तरतूद करण्यात आली आहे.
कन्हेर व म्हसोबा झाप मशानभुमी बांधणीसाठी प्रत्येकी 3.50  लक्ष प्रमाणे 7 लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली. ग्रामपंचायत हद्दीतील सार्वजनिक ठिकाणचे पथदिवे दुरुस्ती 2.50  लक्ष रुपये व नवीन पथदिवे बसवणे 2.17 लक्ष रुपये अशी एकूण 4.67  लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली. आदिवासी वस्त्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी बीबीचा दरा पाईप लाईन व टाकी बांधणे 3.50 लक्ष रुपये, मळगंगा वाडी मोटर बसवणे पाईपलाईन करणे 1.71 लक्ष रुपये कारवाडी पाण्याची टाकी बांधणे पाईपलाईन करणे विंधन विहीर घेणे 2.50 लक्ष रुपये अशी एकूण पाणीपुरवठ्यासाठी 6.73  लक्ष रुपये याची भरीव तरतूद करण्यात आली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा  परिसर गाजरे झाप व भोरवाडी प्रत्येकी 1.62 लक्ष रुपये प्रमाणे 3.24 लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली. अचानक वाडी आदिवासी वस्ती रस्ता बांधणी कामी 2.50 लक्ष रुपये तरतूद करण्यात आली. सिमेंट काँक्रेट रस्ते बांधणीसाठी म्हसोबा झाप ते खंडोबा मंदिर काँक्रिटीकरण रस्ता बांधणे 10 लक्ष रुपये कन्हेर गटार लाईन बांधणी 5 लक्ष रुपये एवढी तरतूद करण्यात आली  गाजरेझाप अंगणवाडी नवीन इमारत बांधणे साठी 10 लक्ष रुपये तरतूद करण्यात आली किशोरवयीन मुली व महिला यांना सॅनेटरी नॅपकिन पुरवणे 1.30 लक्ष रुपये एवढी तरतूद करण्यात आली रंगदास स्वामी मंदिर परिसर, जगदंबा माता मंदिर परिसर, बन वस्ती मंदिर परिसर, मारुती मंदिर ,परिसर श्रीकृष्ण ज्ञान मंदिर परिसर, खंडोबा मंदिर परिसर तसेच चौकाचौकात बाक बसवणे साठी 2.17  लक्ष रुपये एवढी तरतूद करण्यात आली. अंदाजपत्रकात पाणी ,रस्ते, सभामंडप, अंगणवाडी, महिला सबलीकरण, शाळांना शुद्ध पाणी ,गटार व्यवस्था ,पथदिवे, आदिवासी वस्त्यांचा विकास यासाठी 1 कोटी 27 लक्ष रुपये एवढ्या भरीव निधीची तरतूद करण्यात आली.
   यावेळी बोलताना सरपंच गाजरे यांनी शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारणे आवश्यक साधनसामुग्री पुरवणे, अंगणवाडी दर्जा सुधारणे, आदिवासींचा विकास करणे, वीज पुरवठा सुरळीत करणे रंगदास स्वामी ट्रस्ट स्थापन करणे इत्यादी कामांना प्राधान्य दिले जाईल असे सांगितले. यावेळी सरपंच प्रकाश गाजरे, उपसरपंच राणी वाळुंज ग्रामपंचायत सदस्य सखुबाई हांडे, संगीता जाधव, योगिता आहेर, दादाभाऊ पवार गोविंदा आग्रे भाऊसाहेब आहेर पद्मावती दुधवडे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment