निलेश लंके युवा प्रतिष्ठानच्यावतीने पारनेर येथे शिवजयंती साजरी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, April 1, 2021

निलेश लंके युवा प्रतिष्ठानच्यावतीने पारनेर येथे शिवजयंती साजरी

 निलेश लंके युवा प्रतिष्ठानच्यावतीने पारनेर येथे शिवजयंती साजरी


नगरी दवंडी/प्रतिनिधी

पारनेर ः पारनेर- पारनेर शहरामध्ये आमदार निलेश लंके यांच्या जनसंपर्क कार्यालय या ठिकाणी आज दि. 31 मार्च रोजी  आमदार निलेश लंके युवक प्रतिष्ठान कडून तिथी प्रमाणे शिवजयंती उत्सव साजरी  करण्यात आली. सर्व कोरोनाच्या नियमांचे पालन करून ही शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी पारनेर नगर तालुक्याचे आमदार निलेश लंके व निलेश लंके प्रतिष्ठान युवक तालुका अध्यक्ष विजय औटी यांच्या सह सर्व मित्र परिवाराने हा शिवजयंती उत्सव साजरा केला यावेळी पारनेर शहरातील सर्वच युवक व ज्येष्ठ मान्यवर उपस्थित होते. त्याच प्रमाणे हंगा गावात ही दरवर्षी प्रमाणे निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती उत्सव जोरात साजरा करण्यात आला.आमदार निलेश लंके युवक प्रतिष्ठानची शिवजयंती साजरी करण्यात आली यावेळी आमदार लोकनेते निलेश लंके साहेब स्वतः उपस्थित व निलेश लंके प्रतिष्ठान युवक तालुका अध्यक्ष विजुभाऊ औटी व त्यांचा सर्व जिवलग मित्र परिवार  उपस्थित होता कोरणा च्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम सर्व  नियमाचे पालन करून साजरा करण्यात आला.

No comments:

Post a Comment