महाराष्ट्र लहुजी सेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुखपदी अनिता मोहिते यांची निवड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, April 7, 2021

महाराष्ट्र लहुजी सेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुखपदी अनिता मोहिते यांची निवड

 महाराष्ट्र लहुजी सेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुखपदी अनिता मोहिते यांची निवड


नगरी दवंडी/प्रतिनिधी

नेवासा ः महाराष्ट्र लहुजी सेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख पदी अनिता मोहिते यांची एकमताने निवड करण्यात आली.नेवासा तालुक्यातील भानसहिवरा येथे महाराष्ट्र लहुजी सेनेच्या महिला कार्यकर्त्यांची एक बैठक नुकतीच पार पडली. बैठकीत लहुजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष भैरवनाथ भारस्कर यांनी ही निवड जाहीर करून तसे नियुक्तीचे पत्रही अनिता मोहिते यांना दिले. समाजात महिलांवर होणारे अन्याय व अत्याचार दूर करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी भैरवनाथ भारस्कर यांनी केले.
    याप्रसंगी राणी बोरगे, वनिता त्रिभुवन, मंगल सौदागर, शोभा साळवे, मनिषा घोरपडे, लीलीबाई साळवे, आरती साळवे, जिजाबाई साळवे, केशरबाई साळवे, उषा साळवे इंदुबाई भास्कर साळवे, ताराबाई साळवे, संगीता साळवे, नीतू साळवे, सुनीता साळवे, छाया साळवे, सिंधुबाई भारस्कर, मंगल  साळवे, सविता वडागळे, मंगल सौदागर आदी महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment