मक्तापूर येथे शिवजयंती साधेपणाने साजरी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, April 1, 2021

मक्तापूर येथे शिवजयंती साधेपणाने साजरी

 मक्तापूर येथे शिवजयंती साधेपणाने साजरी


नगरी दवंडी/प्रतिनिधी

नेवासा ः नेवासा तालुक्यातील मक्तापूर येथे स्थानिक शिवसेना शाखा व मक्तापूर ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयामध्ये शिवजयंती कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर साधेपणाने साजरी करण्यात आली शिवजयंतीनिमित्त अंगणवाडी व ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना शिवसेना शाखाप्रमुख गणेश झगरे यांच्या वतीने मास्कचे मोफत वाटप करण्यात आले.
   यावेळी झालेल्या कार्यक्रमात स्थानिक शिवसैनिक व उदयन गडाख पाटील मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून शिवप्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. तद्नंतर अंगणवाडी सेविका शोभना साळवे, आरोग्य सेविका कल्पना कोळेकर, छाया साळवे, ग्रामपंचायत कर्मचारी सुनील साळवे, वायरमन मोशे साळवे यांचा कोरोना काळातील उत्कृष्ट सेवेबद्दल सत्कार करण्यात आला.
   यावेळी ग्रामसेवक संजय वाघ, हिराबाई साळवे, योसेफ चव्हाण, अनिल हिवाळे, अरुण साळवे, दीपक चाबुकस्वार, अविनाश हिवाळे, सुभाष चव्हाण, गोरक्षनाथ नवघरे, श्रीमती जगदाळे, आकाश बनकर, श्रीमती बनकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment