गृहमंत्री अनिल देशमुखांचा राजीनामा ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, April 5, 2021

गृहमंत्री अनिल देशमुखांचा राजीनामा !

 गृहमंत्री अनिल देशमुखांचा राजीनामा !मुंबई-
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे ते राजीनामा सोपविणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या सीबीआय चौकशीच्या आदेशानंतर अनिल देशमुखांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी ही माहिती दिली आहे.

   कोर्टाच्या आदेशानंतर अनिल देशमुखांनी राजीनाम्याची तयारी दर्शवली.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ग्रीन सिग्नल दिल्यानंतर अनिल देशमुख आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपविला. आता तूर्तास गृहमंत्रिपदाची जबाबदारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राहणार आहे.
   गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची सीबीआयने (उइख) 15 दिवसांत प्राथमिक चौकशी करावी असे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत.हे अभूतपूर्व प्रकरण आहे. खुद्द माजी मुंबई पोलिस आयुक्तांनीच गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे सत्य बाहेर येणे आवश्यक असल्याने आम्ही प्राथमिक चौकशीचा आदेश देत आहोत असे मुंबई हायकोर्टने म्हटलंय.
   मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीचा आरोप करत मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना 100 कोटी वसुलीचे टार्गेट दिले होते असा आरोप परमबीर सिंह यांनी केला होता.

No comments:

Post a Comment