स्वर्गवासी बाबूजी आव्हाड यांचे कार्य प्रेरणादायी ः खा. डॉ. विखे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, April 1, 2021

स्वर्गवासी बाबूजी आव्हाड यांचे कार्य प्रेरणादायी ः खा. डॉ. विखे

 स्वर्गवासी बाबूजी आव्हाड यांचे कार्य प्रेरणादायी ः खा. डॉ. विखे


नगरी दवंडी/प्रतिनिधी

खरवंडी कासार  ः स्वातंत्र्यसेनानी व माजी आमदार स्वर्गवासी स्वर्गीय आ.  बाबूजी आव्हाड यांचे या दुष्काळी तालुक्यात केलेले कार्य खूप महान असून माझ्यासाठी नेहमीच प्रेरणादायी आहे बाबूजींनी त्यांच्या काळात तालुक्याच्या विकासासाठी बहुमोल योगदान दिले आहे असे महत्वपूर्ण वक्तव्य  खासदार डॉ. विखे पाटील यांनी केले.
   खासदार सुजय विखे पाटील म्हणाले, त्यांचे कार्य पुढे नेण्याचे काम जिल्ह्यात अभय आव्हाड यांनी केले असे मला  वाटते. पाथरी येथे थोर स्वातंत्र्यसेनानी व माजी आमदार  बाबूजी आव्हाड यांच्या शंभराव्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या स्मृतीस अभिनंदन सोहळ्याप्रसंगी ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान व गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप खासदार डॉ. सुजय विखे यांच्या हस्ते करण्यात आले.
   यावेळी पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड उपाध्यक्ष, सुरेश आव्हाड नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे .भा.ज.पा तालुका उपाध्यक्ष गोकुळ दौंड, नंदकुमार शेळके विश्वास आठरे गजानन कोष्टी नगरसेवक प्रसाद आव्हाड बंडू बोरुडे ,अमोल गर्जे,आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
   सध्या महाराष्ट्रात बुद्धीचे राजकारण चालू आहे सध्याचा काळ हा आदरयुक्त भीती असून भीतीयुक्त आदर आहे लोक माझ्याबद्दल चांगले बोलतात का वाईट बोलतात यांनी मला काही फरक पडत नाही कारण या गोष्टीतून प्रत्येक राजकारणी माणसाला जावं लागतं परंतु न करता समाजकारण करणार्‍या अथवा अभय आव्हाड यांना त्यांची योग्यता पाहून भविष्यात पद मिळावे ही माझी इच्छा आहे त्यांचे कार्य खूप मोलाचे असून कोरोना संपल्यावर माझ्यातर्फे बाबूजी 100  शताब्दी कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे म्हटले तसेच  या तीन वर्षात तालुक्यात प्रश्न मार्गी लावणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here