कर्जत तालुक्यात तोतया पत्रकाराचा सुळसुळाट - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, April 5, 2021

कर्जत तालुक्यात तोतया पत्रकाराचा सुळसुळाट

 कर्जत तालुक्यात तोतया पत्रकाराचा सुळसुळाट

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
कर्जत ः कर्जत तालुक्यात तोतया पत्रकारांनी धुमाकूळ घातला असून अशा व्यक्तिमुळे अधिकारी, पदाधिकारी व शासकीय कर्मचारी ही वैतागले असून याचा मोठा फटका गेली अनेक वर्षे निष्ठेने पत्रकारिता करणार्‍या व्यक्तींना सहन करावा लागत आहे. याबाबत सर्वानी जागरूकतेने अशा लोकांशी व्यवहार करावेत असे आवाहन कर्जत तालुका पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
   पत्रकारिता हा वसा आहे, यामध्ये कर्जत तालुक्यातील काही पत्रकार अनेक वर्षांपासून अत्यंत निष्ठेने काम करत आहेत, यामध्यमातून अशा व्यक्तीची ओळख ही तालुक्यात निर्माण झाली आहे मात्र सध्या कर्जत तालुक्यात काही तोतया पत्रकारांनी धुमाकूळ घातला असून आपण पत्रकार आहोत असे सांगत अधिकार्‍यानाही दम देण्यापर्यत या व्यक्तीची मजल गेली असून तालुक्याच्या एका प्रमुख अधिकार्‍यानेच याबाबत माहिती देऊन आपली हतबलता दाखवून दिली आहे. कर्जत तालुक्यात अशा व्यक्ती सध्या अनेकांना फोन करून आपण पत्रकार आहोत असे सांगत उलट सुलट प्रश्न विचारून बेजार करत आहे, इतर पत्रकारांच्या बातम्या कॉपी करून प्रसिद्ध करणार्‍या अशा पत्रकारां मुळे भीक नको पण कुत्रे आवर असे म्हणत काही लोक त्याच्या भूलथापाना भीक घालत त्याच्या मागण्यांना बळी पडत आहेत, मात्र निवडणुकाच्या तोंडावर सातत्याने पत्रकारितेत अशा भुछत्र्या उगवत असतात आणि त्यांना किती थारा द्यायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तालुक्यातील अधिकारी, पदाधिकारी वा नागरिकांनी तालुक्यात कोण, कुठे, कशाचे व  कशा पद्धतीने काम करत आहेत याची माहिती करून घेऊन  अशा लोकांशी व्यवहार करावा, तोतया पत्रकाराशी व्यवहार करणार्‍या लोकांना आगामी काळात इतर पत्रकारानी सहकार्य न करण्याचा निर्णय कर्जत तालुका पत्रकार संघाने घेतला असून यावर बैठक घेऊन सामूहिक निर्णय घेतला आहे. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष मोतीराम शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष गणेश जेवरे, उपाध्यक्ष आशिष बोरा सचिव निलेश दिवटे, खजिनदार मुन्ना पठाण, मार्गदर्शन मच्छीन्द्र अनारसे, सुभाष माळवे, डॉ. अफरोज पठाण आदी पत्रकार उपस्थित होते.

No comments:

Post a Comment