पाटोदा(गरडा)चे येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळेचा झालाय कायापालट - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, April 5, 2021

पाटोदा(गरडा)चे येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळेचा झालाय कायापालट

 पाटोदा(गरडा)चे येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळेचा झालाय कायापालट


नगरी दवंडी/प्रतिनिधी

जामखेड ः जामखेड तालुक्यातील पाटोदा ( गरडा) चे येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळेचा दोन वर्षात कायापालट झाला आहे.या आदर्श शाळेत मुख्याध्यापक उत्तम पवार,उपा.श्रीमती अनिता जोगदंड,श्रीमती सुलभा हजारे,श्रीमती संगिता राठोड,श्रीमती आश्विनी कुमटेकर हे शिक्षक,शिक्षीका कार्यरत आहेत.मुख्याध्यापक उत्तम पवार व शिक्षिकांनी ग्रामस्थाच्यां मदतीने गेल्या वर्षी लोकसहभातून शाळेतीला विद्यार्थ्यांसाठी पीण्याचा पाण्यासाठी बोअरवेल घेतलेला आहे.यावर्षी लाकाऊनच्या काळात जूनमध्ये  मुख्याध्यापक उत्तम पवार यांनी स्वखर्चातून विविध प्रकाराची शाळेच्या प्रांगणात झाडे लावून झाडांची काळजी घेऊन जोपसना केलेली आहे.येथील शाळेच्या भिंती बोलक्या केल्या.भिंतीवर व वॉल कंपाऊन्डवर पाटोदा ग्रामपंचायतच्या सरपंच सौ.प्रियंका प्रदीप माने व उपसरपंच वाहेद पठाण ,सर्व सदस्य यांच्या पुढाकारातून शैक्षणिक  चित्र व रंग रंगोटीचे काम सुरु केले आहे .
   शाळेचे मुख्याध्यापक उत्तम पवार हे शाळेच्या सर्वागींण विकाससाठी नेहमी प्रयत्नशिल असतात. ज्या मुलांसाठी शाळेत आनंद घेण्यासाठी शाळेतील वातावरण आनंददायक झाले आहे ते मुलंच शाळेत नाहीत अशीही खंत त्यानीं व्यक्त केली .शाळेसाठी शाळेतील सर्व शिक्षिका सहकार्य करत असतात . त्याच बरोबर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष समिरभाई पठाण , उपाध्यक्ष प्रविण टापरे,सदस्य प्रदीप वराडे,गफ्फारभाई पठाण,युवराज लंघे, दादासाहेब लंघे,अशोक आमटे, सौ . अचर्ना थोरात,अर्चना मोरे यांच्यासह मा .अध्यक्ष दिनकराव टापरे  यांचे नेहमी शाळेला सहकार्य आसते असे मुख्याध्यापक उत्तम पवार यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment