पॅनकार्ड-आधार लिंक 30 जूनपर्यंत मुदतवाढ. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, April 1, 2021

पॅनकार्ड-आधार लिंक 30 जूनपर्यंत मुदतवाढ.

 पॅनकार्ड-आधार लिंक 30 जूनपर्यंत मुदतवाढ.


नवी दिल्ली -
केंद्र सरकारने नागरिकांच्या आधार क्रमांकाला पॅन क्रमांक जोडण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. आयकर विभागाच्या अधिकृत सोशल मीडिया हॅन्डलवरून ही माहिती देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता, पॅन क्रमांक आधार क्रमांकाला जोडण्यासाठी दिवसभर रांगेत उभ्या राहिलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

   यापूर्वी 31 मार्च 2021 ही अखेरची तारिख होती. तर 1 एप्रिलपासून लिंक न केलेले पॅन क्रमांक बाद होणार होते. त्यामुळे आता 30 जून 2021 पर्यंत नागरिकांना कोणत्याही शुल्काशिवाय किंवा दंडाशिवाय आधार क्रमांक पॅन क्रमांकाला जोडता येईल. ‘इन्कम टॅक्स इंडिया’ या ट्विटर हॅन्डलवरून ही माहिती देण्यात आली आहे. कोविड 19 संक्रमणाच्या दरम्यान नागरिकांना अनेक अडचणी येत आहेत. या अडचणी पाहता आधार क्रमांक पॅन क्रमांकाला जोडण्यासाठी मुदत वाढविली आहे. यापूर्वी उशिराने लिंकिंग केले तर एक हजार रुपये दंड आकारला जाणार होता. त्यामुळे आज अखेरच्या दिवशी अनेक लोक इंटरनेट कॅफेच्या बाहेर आधार आणि पॅन कार्ड हातात घेऊन रांगेत उभे असल्याचे चित्र दिसून येत होते. परंतु, आता नागरिकांना घाबरण्याचे काहीच कारण नाही. मात्र, आता मुदतवाढ मिळालेल्या कालावधीत नागरिकांनी आपापल्या सोयीनुसार दोन्ही कार्ड एकमेकांना लिंक करुन घ्यावेत, अन्यथा पुन्हा त्यांना त्रासाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही देण्यात आलेला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here