कोरोनामुळे आरोग्याची सर्वांनी काळजी घ्यावी : सभापती गुंड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, April 7, 2021

कोरोनामुळे आरोग्याची सर्वांनी काळजी घ्यावी : सभापती गुंड

 कोरोनामुळे आरोग्याची सर्वांनी काळजी घ्यावी : सभापती गुंड

सभापती गुंड यांच्याकडून मेहकरी प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी.
नगरी दवंडी/प्रतिनिधी
चिचोंडी पाटील ः नगर तालुका पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सभापती सुरेखा संदीप गुंड यांनी मेहेकरी तालुका नगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन उपलब्ध सुविधांची पाहणी केली. तसेच नागरिकांना येणार्‍या अडचणी,समस्या जाणून घेतल्या .कोरोना दिवसेंदिवस वाढत आहे सर्वांनी आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन सभापती गुंड यांनी केले. युवा नेते संदीपजी गुंड यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र मेहेकरी येथे कोरोना व विविध अडचणी वर चर्चा केली .
    प्राथमिक आरोग्य केंद्र च्या कर्मचार्‍यांना त्यांच्या कामाबद्दल सभापती गुंड यांनी शुभेच्छा दिल्या .सर्वांनी मास्क व सॅनिटायझरचा वापर करा, सामाजिक अंतर राखणे गरजेचे आहे. कोरोना विषाणू हा दिवसेंदिवस वाढत जातोय सर्वांनी काळजी घ्यावी खबरदारी घेतली तर नक्कीच या आजारावर आपण मात करू शकतो असे प्रतिपादन सभापती सुरेखा गुंड यांनी केले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते संतोष तात्या कर्पे, डॉ. खिळे, किरण थोरात, प्रसाद पवार, बाप्पू घोरपडे आदी उपस्थित होते

No comments:

Post a Comment