वाळकी येथून गोवंश जनावरे जप्त नगर तालुका पोलिसांची कारवाई - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, April 1, 2021

वाळकी येथून गोवंश जनावरे जप्त नगर तालुका पोलिसांची कारवाई

 वाळकी येथून गोवंश जनावरे जप्त नगर तालुका पोलिसांची कारवाई


नगरी दवंडी/प्रतिनिधी

चिचोंडी पाटील ः वाळकी ता.नगर येथे कत्तल करण्यासाठी आणलेल्या 11 लाख 28 हजार रुपये किमतीच्या  38 लहान मोठ्या गाई ताब्यात ,एक 5 लाख रुपये किमतीची पीक अप टेम्पो जप्त, 1 आरोपी अटकेत,3 आरोपीविरोधात गुन्हा दाखल,ताब्यात घेतलेल्या गाईंची माऊली कृपा गोशाळा येथे सुखरूप रवानगी,नगर तालुका पोलिसांची कारवाई.
    वाळकी येथे तोसिफ शेख हा इसम गाई कत्तलीसाठी येणार असल्याची माहिती तालुका पोलिस ठानेचे सपोनि राजेंद्र सानप यांना मिळाली त्यानुसार वाळकी येथे सापळा रचून 1 महिंद्रा पीक अप टेम्पो ताब्यात घेण्यात आला ,त्यामध्ये गोवंश 06 जनावरे आढळून आलेने तोसिफ कडे अधिक चोकशी केली असता त्याने वाळकी धोंडेवाडी रोडवर अखिल कुरेशी याचे शेतातून सदरची जनावरे आणली असल्याचे सांगितले त्यानुसार सपोनि राजेंद्र सानप , पोलीस उपनिरीक्षक जारवाल, पोलीस उपनिरीक्षक राऊत , हेडकॉन्स्टेबल अबनावे, पोलीस नाईक मरकड, कॉन्स्टेबल भालसिंग , पोलीस नाईक खेडकर, कॉन्स्टेबल पालवे,तोरडमल  यांनी छापा टाकला असता त्याचे शेताचे बाजूस झाडाझुडपात 20 गाई बांधल्याचा आढळून आल्या ,तसेच मोसीन कुरेशी याचे प्लॉटवर 12 गाई आढळून आल्या सदर सर्व 38 गाई ताब्यात घेऊन माऊली कृपा गोशाळा येथे पाठवणेत आल्या आहेत व तोसिफ शेख,अखिल कुरेशी,मोसीन कुरेशी रा झेंडिगेट ,अहमदनगर यांचेवर गुन्हा दाखल करणेत आला आहे,एकूण 11 लाख 28 हजार किमतीच्या गाई व 5 लाख किमतीचे पिक अप वाहन असे 16 लाख 28 हजार किमतीचा मुद्देमाल  वाळकी ता नगर येथून नगर तालुका पोलिसांनी जप्त केला आहे.
    सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील ,अपर पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल ,उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील  यांचे मार्गदर्शनाखाली नगर तालुका पो ठानेचे प्रभारी अधिकारी सपोनि राजेंद्र सानप  व पथकातील पोलीस उपनिरीक्षक धनराज जारवाल, रितेश राऊत , हेड कॉन्स्टेबल अबनावे, पोलिस नाईक मरकड, कॉन्स्टेबल भालसिंग , पोलीस नाईक खेडकर, कॉन्स्टेबल पालवे,तोरडमल यांनी केलेली आहे.

No comments:

Post a Comment