अन् त्या परिवाराने .. जपली सामाजिक बांधिलकी .... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, April 19, 2021

अन् त्या परिवाराने .. जपली सामाजिक बांधिलकी ....

 अन् त्या परिवाराने .. जपली सामाजिक बांधिलकी ....

कलिंगड कापुन केला मुलिचा वाढदिवस साजरा ,

तर कोवीड सेंटरला दिली ५३३ अंडे भेट




नगरी दवंडी

पारनेर - समाजात जीवन जगत असताना काही माणस आपल्या कृती तुन एक आगळावेगळा सामाजिक संदेश देत असतात तर सामाजिक बांधिलकी सांभाळून इतराना मदतीसाठी सदैव पुढेच असतात .

पारनेर तालुक्यातील विरोली येथील पत्रकार संजय मोरे व श्री ढोकेश्वर विद्यालय टाकळी ढोकेश्वर येथील विद्यालयात उपशिक्षिका असलेल्या शोभा गायकवाड /मोरे यानी आपली मुलगी समृद्धी हिच्या १० वा वाढदिवस एक आगळ्या वेगळया पद्धतीने साजरा केला .

सध्या राज्यामध्ये मोठया प्रमाणावर कोरोना आजराचा फैलाव होत आहे पारनेर तालुक्यातही रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे या सगळ्या परिस्थितीत शेतकरी मात्र अडचणीत सापडला आसुन अनेक संकटाना तोंड देत आहे त्यामुळे मुलिच्या वाढदिवसाला केक न कापता औक्षण करून कलिंगड कापण्यात आले उद्देश हाच आहे की ज्या बांधवाच्या घरी  वाढदिवस आहे त्याने पाश्चमात्य संस्कृतीतील केक न कापता शेतकऱ्यानी पिकाविलेली फळे विकत घेऊन कापा म्हणजे शेतकऱ्याला पैसे मिळुन तो समाधानी होईल . तसेच

आमदार निलेश लंके यानी सुरू केलेल्या भाळवणी येथील शरदचंद्रजी पवार कोवीड सेंटरला ५३३ अंडे भेट दिली.

आपल्या मुलिच्या वाढदिवसा निमित्त कोवीड सेंटरला दिलेल्या भेटीनेही आमदार निलेश लंके यानीही समाधान व्यक्त केले .

आमदार निलेश लंके यावेळी बोलताना म्हणाले की पत्रकार संजय मोरे यांच्या परिवाराने सामाजिक बांधिलकी समजुन 

कोवीड सेंटरला दिलेल्या मदतीचे समाधान वाटते या समाजहिताच्या कामासाठी सर्वानी पुढं येण्याची गरज आसुन या जागतिक साथीचा सामना करण्यासाठी  सर्वानी सामुहिक प्रयत्नाने  एकत्र येण्याची गरज आहे .

यावेळी, निलेश लंके प्रतिष्ठाणचे राज्य सचिव ऍड राहुल झावरे पारनेर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद झावरे  सत्यम निमसे अरूण पवार प्रमोद गोडसे अमोल दळवी , संदिप रोहकले,

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रसिध्दी प्रमुख श्री निवास शिंदे यांच्यासह प्रतिष्ठाणचे पदाधिकारी उपस्थित होते .

No comments:

Post a Comment