सर्व धर्मीय पू.साधू- साध्वी समुदयाला लवकरच कोवीड लसीकरण करण्याचे राज्यपालांचे यश शहा यांना आश्वासन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, April 20, 2021

सर्व धर्मीय पू.साधू- साध्वी समुदयाला लवकरच कोवीड लसीकरण करण्याचे राज्यपालांचे यश शहा यांना आश्वासन

 सर्व धर्मीय पू.साधू- साध्वी समुदयाला लवकरच कोवीड लसीकरण करण्याचे राज्यपालांचे  यश शहा यांना आश्वासन 


नगरी दवंडी

अहमदनगर - महाराष्ट्र ही साधुसंतांची भूमी म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या सर्व धर्मीय साधुसंतांसह जैन धर्मीय साधु-साध्वी समुदयाला कोविड लसीकरण करणे गरजेचे आहे. यातील अनेक अडचणींमुळे लसीकरणापासून सर्व धर्मीय साधुसंत वंचित राहतात. 

याबाबत आज अल्पसंख्यांक समितीचे उपप्रमुख यश प्रमोद शहा यांनी अखिल भारतीय जैन श्र्वेतांबर महासंघाच्या वतीने स्वतः फोन वरून मा. राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारी साहेबांशी थेट संवाद साधला. त्यांना सर्व परिस्थितीची कल्पना दिली.

  आज अनेक साधुसंत भगवंत देखील कोरोना महामारीने बाधित होत आहेत हे त्यांना निदर्शनास देखील आणून दिले.महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र शहा यांच्या नेतृत्वात विनंती केली की आपण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात सर्व धर्माच्या साधुसंतांना तातडीने लसीकरण करण्यात यावे असे आपण शासनास आदेश  द्यावे ही विनंती सकल जैन समाजाच्या वतीने श्री. यश शहा यांनी केली.

त्यास तात्काळ फोनवर यश शहा यांना सकारात्मक प्रतिसाद देत आपण यात स्वतः लक्ष घालून लवकरात लवकर अडचणी दूर करू असे आश्वासन त्यांनी दिले.

तसेच जैन समाजास महावीर जन्म कल्याणक दिनाच्या शुभेच्छा देखील दिल्या आणि सर्वांनी या महामारी काळात काळजी घ्या असे आवाहन केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here