कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी एक वर्षासाठी राष्ट्रीय आचारसंहिता जारी करण्याची मागणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, April 17, 2021

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी एक वर्षासाठी राष्ट्रीय आचारसंहिता जारी करण्याची मागणी

 कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी एक वर्षासाठी राष्ट्रीय आचारसंहिता जारी करण्याची मागणी

पीपल्स हेल्पलाईन, मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलन व भारतीय जनसंसदचे पंतप्रधानांना निवेदन


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः देशात कोरोना महामारीची परिस्थिती गभीर होत असताना, कोरोनावर यशस्वीपणे नियंत्रण मिळवण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन, मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलन व भारतीय जनसंसदच्या वतीने एक वर्षासाठी कोरोना महामारी राष्ट्रीय आचारसंहिता जारी करण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात आले असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.
केंद्र व राज्य सरकारने कोरोना प्रतिबंधात्मकसाठी जाहीर केलेल्या नियमांची अंमलबजावणी सर्वसामान्य जनता करताना दिसत नाही. यामुळे कोरोचा प्रादुर्भाव वाढत असून, परिस्थिती गंभीर होत आहे. एक वर्षासाठी कोरोना महामारी   राष्ट्रीय आचारसंहिता लागू करण्याची मागणी संघटनेने केली आहे. या आचारसंहितेमध्ये तोंडाला मास्क लावणे, फिजिकल डिस्टन्स पाळणे, लग्नाच्या ठिकाणी 50 लोकांची उपस्थिती आदी नियमांचा समावेश असणार आहे. ही आचरसंहिता मोडणार्यावर साध्या वेशातील पोलीस ऑनलाईन पध्दतीने कारवाई करणार आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नियम मोडणार्याचे आधारकार्ड घेऊन ऑनलाईन दंडात्नक कारवाई केली जाणार आहे. दंड न भरणार्‍या नागरिकांना निवडणुका, सरकारी योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्याची तरदूद असणार आहे. अशा कठोर कारवाईमुळे नियमांची अंमलबजावणी शक्य असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. नागरिकांमध्ये दंडाची भीती निर्माण झाल्यास कोरोनाचे नियम पाळून हे संक्रमण तुटणार आहे.

No comments:

Post a Comment