वडझिरेच्या महसूल कर्मचाऱ्याची मुलगी झाली आरोग्य अधिकारी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, April 23, 2021

वडझिरेच्या महसूल कर्मचाऱ्याची मुलगी झाली आरोग्य अधिकारी

 वडझिरेच्या महसूल कर्मचाऱ्याची मुलगी झाली आरोग्य अधिकारी

पिंपळगाव पिसा प्राथमिक आरोग्य केंद्रात घेतेय रुग्णांची काळजी...




 पारनेर / प्रतिनिधी

श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा प्राथमिक आरोग्य केंद्रात नव्याने रुजू झालेल्या डॉ.तबसुम इब्राहिम पठाण यांनी मेहनतीच्या जोरावर वैद्यकीय पदवी प्राप्त केली....

डॉ.तबसुम पठाण ह्या पारनेर तालुक्यातील वडझिरे येथील रहिवासी असून त्यांचे वडील महसूल कर्मचारी आहेत.वडिलांनी तिन्ही मुलांना चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न केला.त्यासाठी त्यांना गृहिणी असलेल्या त्यांच्या पत्नी अमिना यांनी चांगली साथ दिली.जखणगाव येथील त्यांच्या मावशी व मावसभावानी शिक्षण घेत असताना खूप मदत केली.

मोठी मुलगी तमन्ना हिने एम.एस्सी बीएड पूर्ण करून तीही सेट परीक्षा उत्तीर्ण झाली आहे.मुलगा समीर एलएलबी पदवीचे शिक्षण घेत आहे.

डॉ.तबसुम पठाण आई-वडिलांच्या जिद्दीला सलाम करत प्राथमिक  शिक्षण घेतानाच डॉक्टर बनण्याची खूणगाठ बांधली होती.त्यावरूनच तिने आठवी मध्ये शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविले. नंतर 10 वी मध्ये 92 टक्के गुण मिळविले.इयत्ता 12 वी मध्ये 81 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले.डॉक्टर बनण्याची जिद्दी होती.

त्यादृष्टीने अहमदनगर येथील गुणे आयुर्वेदिक महाविद्यालयात प्रवेश मिळवला.तिथेही डॉ.तबसुम पठाण यांनी चांगल्या गुणांमुळे राज्य शासनाच्या शिष्यवृत्तीचा लाभ मिळवला.वडिलांची इच्छा डॉ.पठाण यांनी आरोग्य अधिकारी बनून पूर्ण केली.

सध्या कोरोनाच्या काळातच ग्रामीण रुग्णांची सेवा करण्याची त्यांना संधी मिळाली. पिंपळगाव पिसा प्राथमिक आरोग्य केंद्रात त्या द्वितीय आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्या मनापासून रुग्णांची सेवा करतायेत गेल्या.2 महिन्यापासून त्या एकदाही गावी वडझिरे येथे सुट्टीवर गेल्या नाहीत.अखेर त्यांनी आरोग्य अधिकारी बनण्याचे स्वप्न तडीस नेले.

No comments:

Post a Comment