प्लाझ्मादान करुन कोरोना रुग्णांसाठी मानवतादूत बना -उद्धव शिंदे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, April 26, 2021

प्लाझ्मादान करुन कोरोना रुग्णांसाठी मानवतादूत बना -उद्धव शिंदे

 प्लाझ्मादान करुन कोरोना रुग्णांसाठी  मानवतादूत बना -उद्धव शिंदे नगरी दवंडी

अहमदनगर - राज्यातील कोरोना प्रादुर्भावाच्या वाढत्या प्रार्श्वभूमीवर आरोग्य व्यवस्थेची  दयनीय अवस्था झालेली आहे. राज्यातील सर्वच भागात कोरोना रुग्णांवर उपचारासाठी लागणाऱ्या औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे, त्यामुळे रुग्णांचे योग्य उपचाराअभावी मृत्यू होत आहेत. अश्यातच प्लाझ्मा थेरपी रुग्णांसाठी आशेचा किरण बनली आहे, परंतु प्लाझ्मादाना विषयी समाजात जनजागृती नसल्याने रुग्णांना योग्य वेळी प्लाझ्मा मिळणे कठीण होत आहे. कोरोना उपचारासाठी लागणाऱ्या औषधांचे सुनियोजन करण्याचे काम प्रशासकीय पातळीवर चालले असताना कोरोनातून बरे झालेल्या नागरीकांनी प्लाझ्मादान करुन आपल्या समाजबांधवाचे प्राण वाचवण्यास मदत करावी, असे आवाहन स्नेहबंध सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष उद्धव शिंदे यांनी केले आहे.

 आतापर्यंत स्नेहबंध फाउंडेशन मार्फत पाच ते सहा जणांनी प्लाझ्मा डोनेट केले आहे.  कोरोना काळामध्ये नागरिकांना जास्तीत जास्त मदत करण्याचे काम स्नेहबंध फाउंडेशन करत आहे.


प्लाझ्मादान कोण करु शकतं?

 १८ ते ६० वयादरम्यानचे नागरिक ज्यांनी २८ ते ३० दिवसांपूर्वी कोरोनावर मात केली आहे.

कोरोनामुक्त होऊन चार -सहा महिन्यांच्या कालावधीपर्यंत करोनामुक्त झालेल्या व्यक्तीच्या रक्तातील प्लाझ्मामध्ये कोरोना प्रादुर्भावाविरुद्ध लढणाऱ्या अँटीबॉडीज असू शकतात. ते प्लाझ्मादान करु शकतात.


प्लाझ्मादान कुठे करावे

शासनाच्या मान्यताप्राप्त रक्तपिढीमध्ये प्लाझ्मादान करता येते. किंवा ज्या रुग्णालयात रुग्णाला प्लाझ्माची गरज आहे. अशा रुग्णालयात सोयीनुसार प्लाझ्मा दान करता येते.

प्लाझ्मादानामुळे कोणत्याही प्रकारची रोगप्रतिकारशक्ती कमी होत नसुन एका योग्य प्लाझ्मा दात्यामुळे २-४ कोरोना रुग्णांना वाचवण्यासाठी मदत होऊ शकते.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार अलीकडच्या काळातील कोरोना नवीन स्ट्रेन आहे, म्हणून गेल्या दोन ते तीन महिन्यात कोरोनामुक्त झालेल्या नागरीकांचे प्लाझ्मादान हे  रुग्णांना नवसंजीवनी ठरु शकते.

स्नेहबंध फाउंडेशन सोशल मीडिया मार्फत नागरिकांना प्लाझ्मा डोनेट करा, असे आवाहन  करत आहे, यामुळे  आतापर्यंत पाच ते सहा नागरिकांनी स्नेहबंध फाउंडेशन मार्फत प्लाझ्मा डोनेट केले. .एक प्लाझ्मा डोनर मुळे दोन जणांचे जीव वाचतात. तरी नागरिकांनी जास्तीत जास्त प्लाझ्मा डोनेट करावे, असे आवाहन स्नेहबंध फाउंडेशनचे अध्यक्ष उद्धव शिंदे यांनी केले आहे

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here