नगरकरांची अपेक्षा. उंटावरून शेळ्या हाकू नका! कोरोना रुग्णांशी संवाद साधा. सत्य परिस्थिती जाणून घ्या. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, April 16, 2021

नगरकरांची अपेक्षा. उंटावरून शेळ्या हाकू नका! कोरोना रुग्णांशी संवाद साधा. सत्य परिस्थिती जाणून घ्या.

 नगरकरांची अपेक्षा. उंटावरून शेळ्या हाकू नका! कोरोना रुग्णांशी संवाद साधा. सत्य परिस्थिती जाणून घ्या.

पालकमंत्री मुश्रीफ उद्या जिल्हा दौर्‍यावर..


अहमदनगर -
पालकमंत्री हसन मुश्रीफ उद्या नगर जिल्ह्याच्या दौर्‍यावर असून शिर्डी, कोपरगाव मध्ये कोरोनाची स्थिती लसीकरणाबाबत आढावा बैठक घेणार असून नगर शहरातही आढावा बैठक घेऊन कोरोना लसीकरण, कोरोनाची स्थिती जाणून पत्रकार परिषद घेणार आहेत. नगरकरांची पालकमंत्र्यांकडून एकच अपेक्षा आहे. कागदी घोडे नाचविण्यापेक्षा नगरकरांना खरा न्याय द्या.. प्रशासनातील अधिकार्‍यांची संवाद साधण्यापेक्षा शासकीय, खाजगी रुग्णालयातील रुग्णांशी संवाद साधा. सत्य स्थिती जाणून घ्या. मनसे म्हणतेय त्याप्रमाणे उंटावरून शेळ्या हाकु नका..
मुश्रीफ यांचा दौरा पुढीलप्रमाणे, उद्या सकाळी 8.15 वाजता जुहू विमानतळ येथून खाजगी विमानाने शिर्डीकडे प्रयाण. सकाळी 9वाजता शिर्डी विमानतळ येथे आगमन व तेथून शासकीय मोटारीने कोविड केअर सेंटर व 250 बेड्स च्या कोविड हेल्थ केअर सेंटरकडे प्रयाण व पाहणी. सकाळी 10 ते 10-45 राहाता तालुक्यातील कोरोना सद्यस्थिती, उपाययोजना, लसीकरणाबाबत आढावा बैठक.
(स्थळ -श्री साईबाबा हॉस्पीटल हॉल, शिर्डी. सकाळी 10-45 वाजता शिर्डी येथून शासकीय मोटारीने कोपरगावकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता कोविड केअर सेंटर, एसएसजीएमकॉलेज कोपरगाव येथे आगमन व पाहणी. सकाळी 11.15 वाजता महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट येथील 300 बेड्स कोविड सेंटरची पाहणी. सकाळी 11-30 ते 12-30 कोपरगाव तालुक्यातील कोरोना सद्यस्थिती, उपाययोजना, लसीकरणाबाबत आढावा बैठक (स्थळ- कृष्णाई मंगल कार्यालय, कोपरगाव.) दुपारी 12-30 वाजता कोपरगाव येथून मोटारीने शासकीय विश्रामगृह अहमदनगरकडे प्रयाण. दुपारी 1 वाजता शासकीय विश्रामगृह अहमदनगर येथे आगमन व राखीव. दुपारी 3 ते 4 वा. अहमदनगर जिल्हयातील कोरोना सद्यस्थितीचा आढावा, लसीकरण व त्यावरील उपाययोजना याबाबत आढावा बैठक. स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर. दुपारी 4 ते 4-45 वाजता पत्रकार परिषद.स्थळ जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर. सायंकाळी 4-45 वाजता अहमदनगर येथून मोटारीने शिर्डी विमानतळाकडे प्रयाण. सायंकाळी 5-45 वाजता शिर्डी विमानतळ येथे आगमन. सायंकाळी 6 वाजता खाजगी विमानाने शिर्डी येथून बेळगाव (कर्नाटक) विमानतळाकडे प्रयाण.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here