एमआयडीसी मधील कामगारांची काळजी घेत, योग्य नियम बनवा, पाटोळे यांच्या मुद्द्यावरून मंत्री थोरात यांचे अधिकाऱ्यांना आदेश - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Sunday, April 25, 2021

एमआयडीसी मधील कामगारांची काळजी घेत, योग्य नियम बनवा, पाटोळे यांच्या मुद्द्यावरून मंत्री थोरात यांचे अधिकाऱ्यांना आदेश

 एमआयडीसी मधील कामगारांची काळजी घेत, योग्य नियम बनवा, पाटोळे यांच्या मुद्द्यावरून मंत्री थोरात यांचे अधिकाऱ्यांना आदेशनगरी दवंडी

अहमदनगर - महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, मनपा आयुक्त शंकर गोरे,  सिव्हिल सर्जन डॉ. पोखरणा, उपजिल्हाधिकारी संदीप निचित, तहसीलदार उमेश पाटील, या शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये कोरोना प्रादुर्भावाचे संदर्भात कलेक्टर ऑफिस येथे अहमदनगर जिल्हा आढावा बैठक घेतली, 

या बैठकीमध्ये यु. कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मयूर पाटोळे यांनी एमआयडीसी मध्ये सर्वच कारखाने सुरू आहे, नियमांचे बरेच ठिकाणी पालन होत नसल्याने, रुग्ण संख्येत भर पडत आहे हा मुद्दा उपस्थित केला. यावेळी नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांनी सांगितले की मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे की एमआयडीसी बंद केल्यास बऱ्याच गोष्टी ठप्प होतील परंतु एमआयडीसीमध्ये नियमांचे काटेकोर पालन होणे गरजेचे आहे त्या संदर्भात नवीन प्रोटोकॉल बनवा, कामगारांची सुरक्षितता बाळगून काम कसे सुरू राहील असे नियम व अटी लागू करा अशा सूचना यावेळी अधिकाऱ्यांना थोरात साहेब यांनी केल्या. यावेळी ज्येष्ठ नेते दिप चव्हाण देखील उपस्थित होते .

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here