दारू विक्रीला विरोध केल्याने एकास जीवे मारण्याचा प्रयत्न… - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, April 29, 2021

दारू विक्रीला विरोध केल्याने एकास जीवे मारण्याचा प्रयत्न…


 दारू विक्रीला विरोध केल्याने एकास जीवे मारण्याचा प्रयत्न…


नगरी दवंडी

अहमदनगर –   प्लॉटवर दारूविक्री करण्यास विरोध केल्या आणि याबाबत पोलिसांना माहिती दिल्याच्या कारणावरून सहा जणांनी गज लाकडी दांडक्याने एकाला मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाबद्दल मिळालेली माहिती अशी की दी. 28 एप्रिल मंगळवारी सायंकाळी नागापूर एमआयडीसीतील तारा पान जवळ ही घटना घडली आहे या मारहाणीत रवींद्र वामन सुपेकर (वय 50 रा. झोपडी कॅन्टीन अहमदनगर) हे जखमी झाले आहेत. त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून प्रेम भाकरे, कुबड्या दशरथ पालवे आणि इतर चार अनोळखी  इसमांविरुद्ध खुनाचा प्रयत्न कलमांतर्गत गुन्हा दाखल केलाय.

मंगळवारी सायंकाळी सुपेकर हे तरापान जवळ असताना तेथे आरोपी आले  सुपेकर यांनी आरोपीला म्हणाले की   माझ्या प्लॉटमध्ये दारूविक्री का करतात. तसेच आरोपी प्रेम भाकरे यांचा मोबाईल नंबर पोलीस ठाण्यात दिल्याचा राग येऊन आरोपी हे फिर्यादी यांच्या दुचाकीला आडवे होत त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर यांनी फिर्यादीला गज व लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे . पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज  आठरे करीत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here