आ. लंकेंंनी शब्द पाळला ! बिनविरोध ग्रामपंचायतींना २५ लाखांचा निधी ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, April 23, 2021

आ. लंकेंंनी शब्द पाळला ! बिनविरोध ग्रामपंचायतींना २५ लाखांचा निधी !

 आ. लंकेंंनी शब्द पाळला ! बिनविरोध ग्रामपंचायतींना २५ लाखांचा निधी ! 

प्रविण दरेकर यांना आ. लंके यांची चपराक :कोरोनाच्या संकटातही निधी मंजुर ! 



पारनेर : प्रतिनिधी 

बिनविरोध निवडणूक करा, ग्रामपंचायतीस २५ लाखांचा निधी देतो असे आवाहन करणाऱ्या आ. लंके यांनी बिनविरोध ग्रामपंचायतींना निधी मंजुर करण्याची जबाबदारी पार पाडली आहे ! 

तालुक्यातील ग्रामपंचायतींना  कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर जाहिर झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रीक निवडूकांदरम्यान आ. नीलेश लंके यांनी मतदार संघातील नागरीकांना बिनविरोध निवडणूका करण्याचे आवाहन केले होते. बिनविरोध निवडणूक करणाऱ्या ग्रामपंचायतीस २५ लाखांचा निधी देतो असे अश्‍वासनही आ. लंके यांनी दिले होते. आ. लंके यांनी केलेल्या या आवाहानास राज्यभर प्रसिद्धी मिळाली. विधानपरीषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी लंके यांच्या आवाहनावर शंका उपस्थित करीत इतका मोठा निधी कोणी देउ शकत नाही हा राजकिय स्टंट असल्याची टिका केली होती. त्यावेळी आ. लंके यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता मी दिलेला शब्द पाळणारा आहे, वाचाळविर नाही असे सांगितले होते. 

 मतदारसंघातील विरोधकांनीही आ. लंके यांच्यावर टिकेची झोड उठविली होती. तालुक्यातील तब्बल ७० ग्रामपंचायती आमच्या ताब्यात आहेत असा दावा करीत लंके समर्थकांनी आ. लंके यांच्या वाढदिवसानिमित्त त्याची जाहिरातबाजीही केली होती. 

लंके समर्थकांच्या दाव्यानुसार तालुक्यातील ८८ ग्रामपंचायतींच्या निवडणूका झाल्या. त्यापैकी हंगे, शिरापूर, रांधे, कारेगांव, वेसदरे, पिंप्रीपठार, जाधववाडी,  भोयरेगांगर्डा व पळसपूर या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या.  तसेच नगर तालुक्यातील आकोळनेर ही ग्रामपंचायतीही बिनविरोध झाली.आ. लंके यांच्या आवाहनास प्रतिसाद देत अनेक गावांमध्ये सकारात्मक वातवरण होते. मात्र विरोधकांनी खोडा घातल्याने सुमारे पन्नास टक्के  ग्रामपंचायतीच्या निवडणूका बिनविरोध होउ शकल्या नाही. पाबळ, जातेगांव, वडगांव दर्या, माळकूप ,डिकसळ, पठारवाडी या गावांमध्ये एका उमेदवाराने माघार न घेतल्याने निवडणूक प्रक्रिया राबविली गेली. बिनविरोध निवडणूकीच्या आ. लंके यांच्या आवाहनामुळे तब्बल २१० ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडूण आले होते. 

प्रत्येकी २५ लाख निधी मंजुर झालेली गावे व निधी पुढील प्रमाणे : पाबळ तळेवाडी ते पांढरकरवस्ती रस्ता करणे १५ लाख, जवळा : जवळा  ते गाडीलगांव रस्ता करणे २५ लाख, पळसपूर येथे स्मशानभुमी सुशोभिकरण २५ लाख, शिरापूर येथे उचाळे वस्ती शिरापूर रस्ता करणे २५ लाख, हंगे येथे सामाजिक सभागृह बांधणे ५० लाख, भोयरे गांगर्डा येथे गजाबाई  मुक्ताबाई मंदीर पेव्हींग ब्लॉक बसविणे २५ लाख, कारेगांव चारंगेश्‍वर मंदीर सभागृह १५ लाख तसेच मुक्ताबाई मंदीर पेव्हींग ब्लॉक १० लाख, पिंप्रीपठार येथे भैरवनाथ मंदीर सभामंडप २५ लाख, वेसदरे येथे सांस्कृतीक भवन २५ लाख, जाधववाडी स्मशानभुमी १० लाख तसेच प्रवेशव्दार १५ लाख, रांधे येथे रांधूबाई सभामंडप १५ लाख, मुस्लीम मज्जीद सुशोभिकरण १० लाख ,देवसवडे येथे टेकडवाडी ते काळेवाडी घाट २५ लाख, राळेगणथेरपाळ येथे डोमेवस्ती ते खंडोबावस्ती रस्ता १५ लाख, कडूस येथे वाघाजाई मंदीर सभामंंडप ५ लाख, नांदूरपठार येथे श्रीकृष्ण मंदीर सुशोभिकरण ५ लाख, बाबुर्डी बेंद ता. नगर गावठाण ते शिवरस्ता २५ लाख, पिंप्रीघुमट ते हंंडेवस्ती रस्ता नळकांडी पुलासह तयार करणे २० लाख, आकोळनेर गावांतर्गत कॉक्रीटीकरण १० लाख, देउळगांवसिद्धी सांस्कृतीक सभागृह बाधकाम ५० लाख,बाबुर्डी घुमट रस्ता २० लाख, नांदगांव येथे होलट वस्ती ते कोलबेट रस्ता १० लाख, हिंगणगांव येथे कुरणमळा रस्ता २५ लाख. 


बिनविरोध न झाल्याने कोटयावधींचा निधी परत ! 

 ग्रामपंचायत निवडणूका बिनविरोध करा, प्रत्येक गावांना २५ लाखांचा निधी देतो असे आवाहन मी केले होते. खरे तर अनेक ग्रामपंचायतींनी त्यास प्रतिसाद देणे अपेक्षित होते. ग्रामस्थांनी प्रतिसादही दिला, मात्र राजकीय हेतूने त्यात खोडा घातला गेला. ज्या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या, त्यांना निधी देउन मी माझी वचनपुर्ती केली आहे.इतर ठिकाणी प्रतिसाद मिळाला नाही, तो निधी परत गेला.  उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनीं मदत केली.

नीलेश लंके 

आमदार

No comments:

Post a Comment