कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे साई मंदिर दर्शनासाठी बंद - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, April 5, 2021

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे साई मंदिर दर्शनासाठी बंद

 कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे साई मंदिर दर्शनासाठी बंदनगरी दवंडी

अहमदनगर - कोरोनामुळे साई मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे.तसेच साई संस्थानची भक्तनिवास व्यवस्थाही या काळात बंद असेल. प्रसादालय व कॅन्टीन सुद्धा बाहेरून येणाऱ्या भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रसादालयात केवळ रुग्णालय व कोविड सेंटरच्या रुग्णांसाठीच जेवण बनविले जाणार असल्याचेही ठाकरे यांनी स्पष्ट केले. यावेळी मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, प्रशासकीय अधिकारी डॉ. आकाश किसवे, वैद्यकीय संचालक डॉ. प्रितम वडगावे, डॉ. मैथिली पितांबरे, मंदिर प्रमुख रमेश चौधरी, संरक्षण प्रमुख परदेशी, तसेच विविध विभागांच्या प्रमुखांची उपस्थिती होती.

साई संस्थानच्या इतिहासात साथीचा संसर्ग रोखण्यासाठी तिसऱ्यांदा मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येत आहे.१९४१ मध्ये कॉलराचा संसर्ग रोखण्यासाठी मंदिर ऐन रामनवमीत बंद ठेवण्यात आले होते. त्यावेळी शिर्डीत आलेल्या भक्तांना लस टोचण्यात आली. बाहेरून येणाऱ्या भाविकांना पोलिसांनी शिर्डीच्या शिवेवर अडवून तेथूनच परत पाठवले. यानंतर प्रथम कोरोनाचा संसर्ग सुरू होताच १७ मार्च २०२० पासून १५ नोव्हेंबर २०२० पर्यंत मंदिर बंद ठेवण्यात आले. त्यानंतर १६ नोव्हेंबरला मंदिर पुन्हा सुरू झाल्यानंतरही २३ फेब्रुवारी २०२१ पासून दर्शनाच्या वेळा सकाळी सहा ते रात्री नऊपर्यंत कमी करण्यात आल्या. यामुळे पहाटेची व रात्रीची आरती भक्तांविना होऊ लागली. त्यानंतरही कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन २८ मार्च २०२१ पासून वेळेत आणखी कपात करून दर्शनाची वेळ सकाळी सव्वा सात ते रात्री पावणे आठ करण्यात आली. यानंतर आता सोमवारी (दि. ५) रात्री आठ वाजल्यापासून ३० एप्रिलपर्यंत शासनाच्या ब्रेक दी चेन धोरणानुसार पुन्हा मंदिर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here