कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी नगर तालुका प्रशासन सज्ज - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, April 13, 2021

कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी नगर तालुका प्रशासन सज्ज

 कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी नगर तालुका प्रशासन सज्ज

9 प्राथमिक आरोग्य केंद्र व 1ग्रामीण रुग्णालयाद्वारे 450 रुग्णांची 

प्रत्येक गावात ग्रामसमितीची स्थापना
तालुक्यातील प्रत्येक गावात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरपंचांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसमिती स्थापन केली असून यामध्ये तलाठी, ग्रामसेवक, आशासेविका यांचा समावेश केला आहे. समिती मार्फत लॉकडाऊन मध्ये बाजारपेठा बंद करणे, दुकाने बंद ठेवणे, दंडात्मक कारवाई करणे, दिवसातून दोनदा दवंडी देणे, प्रबोधन करणे आदी कामे पार पाडली जाणार आहेत.  समित्यांचे कामकाज पाहण्यासाठी 36 पर्यवेक्षक नेमले असून त्यांना नियंत्रण अधिकारी म्हणून ना. तहसीलदार अभिजित बारवकर, हे कामकाज पहात असून त्यांना गायकवाड, गायके हे सहाय्य करीत आहेत.

घाबरून न जाता धैर्याने सामोरे जावे’...
 कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत असून तालुक्यातील सर्व नागरिकांनी घाबरून न जाता धैर्याने कोरोनाला सामोरे जावे. शासनाच्या निर्देशांचे पालन करावे. सामाजिक अंतर ठेवावे,सतत मास्क व सॅनिटायझर चा वापर करावा. लक्षणे आढळल्यास चाचणी करून उपचार करावा. व घराबाहेर विनाकारण न पडता घरातच सुरक्षित राहावे असे आवाहन तहसीलदार उमेश पाटील यांनी केले आहे.


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः
अहमदनगर : राज्यात कोरोना विषाणूचा हाहाकार सुरुच असून कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी नगर तालुका प्रशासन सर्व ताकदीनिशी सुसज्ज झाले आहे. महानगरपालिका हद्दीत सर्वाधिक रुग्ण दररोज आढळत असून नगर शहराभोवती चोहो बाजूनी असलेल्या नगर तालुक्यातही मोठया प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. अशा परिस्थितीत तालुका प्रशासनाद्वारे सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यानुसार तालुक्यातील 9 प्राथमिक आरोग्य केंद्रे व 1 ग्रामीण रुग्णालयाद्वारे रुग्णांची सोय करण्यात आली आहे. यामध्ये जेऊर, बुर्‍हाणनगर, अरणगाव, निंबळक व चिचोंडी पाटील येथे कोव्हीड सेंटर उभारले असून त्यांची एकत्रित क्षमता 450 रुग्णांची आहे.
कोव्हीड केअर सेंटरच्या ठिकाणी उपचार, भोजन, निवास व्यवस्था व अन्य सोयीबाबत तहसीलदार उमेश पाटील समक्ष दैनंदिन भेटी देऊन आढावा घेत आहेत. तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती मांडगे व त्यांचे वैद्यकीय अधिकारी कोरोना रुग्णांवर उपचार करत असून कॉन्टेन्टमेन्ट झोन चे व्यवस्थापन व ग्रामस्तरीय समित्यांच्या कामकाजांचे पर्यवेक्षण गटविकास अधिकारी धाडगे हे करत आहेत.

No comments:

Post a Comment