स्वयंशिस्त हीच कोरोनावरील लस - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, April 9, 2021

स्वयंशिस्त हीच कोरोनावरील लस

स्वयंशिस्त हीच कोरोनावरील लस


मा
गील काही काळ खाली आलेला कोरोनाचा आलेख आता पुन्हा वर जात आहे. राज्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात दुपटीने कोरोनाचे रुग्ण सापडत आहे. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यातील परिस्थिती चिंताजनक आहे. मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातही तीच परिस्थिती आहे. राज्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक होतोय याला नागरिकांचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे. गेल्या काही दिवसांच्या कालावधीमध्ये राज्यातील बहुतेक व्यवहार पूर्ववत सुरू झाल्याने नागरिकांना कोरोनाचा विसर पडला. लस आली या भ्रमात  राहिल्याने नागरिक कोरोनाची त्रिसूत्री विसरून गेले. कोरोनाचा दर कमी झाला पण कोरोना हद्दपार झालेला नाही याचा नागरिकांना विसर पडला म्हणूनच नागरिकांच्या चेहर्‍यावरील मास्क हनुवटीवर आला. सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला. सॅनिटायजरचा नागरिकांना विसर पडला त्याचा परिणाम म्हणून कोरोना पुन्हा आक्रमक झाला. आतातरी नागरिकांनी खबरदारी बाळगावी. सार्वजनिक कार्यक्रम, विवाह समारंभ, अंत्यविधी, याला नगरिकांनी  गर्दी करू नये. सर्वात महत्वाचे म्हणजे सॅनिटायजर, मास्क आणि  सोशल डिस्टन्स ( एस एम एस ) या त्रिसूत्रीचा वापर करावा. सरकारने दिलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. लस आली म्हणजे कोरोना गेला या भ्रमात नागरिकांनी  राहू नये. कोरोनाला हद्दपार करायचे असेल तर स्वयंशिस्तीला पर्याय नाही. स्वयंशिस्त हीच कोरोनवरील लस आहे हे नागरिकांनी विसरू नये.  जर नागरिकांना स्वयंसित आणि सॅनियजर, मास्क आणि सोशल डिस्टन्स (एस एम एस) या त्रिसूत्रीचा विसर पडला तर त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल. साधारणपणे एक वर्षापूर्वी आपली काय परिस्थिती होती  याचा विचार करुनच नागरिकांनी खबरदारी घेत दैनंदिन व्यवहार करावेत. गेल्यावर्षी मार्च महिन्यातच महाराष्ट्र आणि देशात लॉकडाऊनला  सुरवात झाली तेंव्हा सर्वसामान्य नागरिकांचे जे हाल झाले ते पुन्हा होऊ द्यायचे नसेल तर नागरिकांना स्वयंशिस्त पाळावीच लागेल.
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
9922546295

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here