अवैधरित्या करोना चाचण्या करणारांवर कारवाई करावी मनसेचे शहराध्यक्ष वसिम राजे यांची मागणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Sunday, April 25, 2021

अवैधरित्या करोना चाचण्या करणारांवर कारवाई करावी मनसेचे शहराध्यक्ष वसिम राजे यांची मागणी

 अवैधरित्या करोना चाचण्या करणारांवर कारवाई करावी

मनसेचे शहराध्यक्ष वसिम राजे यांची मागणीनगरी दवंडी

पारनेर प्रतिनिधी :

शहरात व तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात येत आहेत.अवैधरित्या करण्यात येणाऱ्या चाचण्यांमध्ये सकारात्मक अहवाल प्राप्त झालेल्या करोना बाधित रुग्णांची नोंद महसूल व आरोग्य प्रशासनाकडे करण्यात येत नाही.असे रुग्ण सार्वजनिक ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी वावरत असल्याने

तालुक्यात करोना संसर्गाचा फैलाव वेगाने होत आहे.त्यामुळे अवैधरित्या रॅपिड अँटीजेन टेस्ट करणाऱ्या व्यक्तींवर,रुग्णालयांवर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष वसिम राजे यांनी तहसीलदार ज्योती देवरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.खासदार डॉ.सुजय विखे यांची भेट घेऊन राजे यांनी यासंदर्भात प्रशासनाला सूचना देण्यात याव्यात अशी विनंती केली.

            निवेदनात म्हटले आहे की, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) मान्यता दिलेले रॅपिड अँटीजेन टेस्ट किट केवळ जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये,प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांसह मान्यताप्राप्त कोविड उपचार केंद्रामध्ये उपलब्ध आहेत.या ठिकाणी करोना संसर्ग चाचणी करण्यात आलेल्या व सकारात्मक अहवाल आलेल्या रुग्णांची नोंद प्रशासनाकडे असते.त्यामुळे संबंधित रुग्णांवर उपचार करण्याबरोबरच रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी करणे,लक्षणे नसलेल्या रुग्णांना विलगीकरणात ठेवणे आदी प्रतिबंधक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करणे प्रशासनाला शक्य होते.संसर्गाचा फैलाव रोखता येतो.

          अवैधरित्या करण्यात येणाऱ्या रॅपिड अँटीजेन टेस्टसाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेची मान्यता नसलेले किट वापरण्यात येते.अश्या चाचण्या विश्वासार्ह नसल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.तसेच अवैधरित्या चाचण्या करण्यात आलेल्या रुग्णांची नोंद प्रशासनाकडे नसल्याने करोनाबाधित रुग्ण बिनदिक्कतपणे सार्वजनिक ठिकाणी, बाजारपेठा, भाजीबाजार फळबाजारात वावरतात.ही परिस्थिती कायम राहिली तर तालुक्यात करोना संसर्गाचा उद्रेक टाळण्यासाठी अवैधरित्या चाचण्या करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी वसिम राजे यांनी तहसीलदार ज्योती देवरे यांच्याकडे केली आहे.

नागरिकांनी सरकारी रुग्णालयांमध्ये तपासणी करावी

करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तहसीलदार ज्योती देवरे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य व महसूल प्रशासन दिवस रात्र काम करीत आहे.प्रशासनाच्या या प्रयत्नांना जनतेची साथ मिळाली तर तालुक्यातील संसर्ग आटोक्यात येण्यास मदत होईल.करोना सदृश लक्षणे असलेल्या नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयांमध्ये, प्राथमिक आरोग्य केंद्रात,उपकेंद्रात चाचणी करणे आवश्यक आहे.

वसिम राजे, शहराध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना.

No comments:

Post a Comment