वास्तव स्वीकारायला हवं - शरद पवार. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, April 8, 2021

वास्तव स्वीकारायला हवं - शरद पवार.

 वास्तव स्वीकारायला हवं - शरद पवार.

कठोर निर्बंध, दुसरा पर्याय नाही


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः ‘राज्यातील वैद्यकीय कर्मचारी अहोरात्र झटत असून परिस्थीती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. राज्य सरकारला नाईलाजाने कठोर निर्बंध करावे लागत आहेत, याला दुसरा पर्याय नाही. केंद्र सरकारचंही हेच म्हणणं आहे. केंद्र सरकार राज्याला सहकार्य करण्यास तत्पर आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांच्याशी मी संपर्क साधला. त्यावेळी संपूर्णपणे महाराष्ट्राच्या पाठिशी असल्याचं केंद्रानं सांगितलं आहे,’ असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.
राज्यात करोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढतोय. करोनाची रोजची आकडेवारी 50 हजारांवर पोहोचली आहे. त्यामुळं सरकारनं 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लावले आहेत. मात्र, व्यापरी वर्गाकडून मोठ्या प्रमाणात निर्बंधांना विरोध होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी फेसबुक लाइव्हद्वारे राज्यातील जनतेसोबत संवाद साधला आहे. जनतेच्या जीवाच्या दृष्टीनं राज्य सरकार कठोर निर्णय घेत आहेत. त्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे, असं आवाहन शरद पवारांनी केलं आहे. ‘कामगार, शेतकरी, व्यापारी, सर्वसामान्य सर्वानाच या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. कित्येकांना आर्थिक झळ बसतेय. या परिस्थितीला धैर्यानं सामोरे गेले पाहिजे, त्याला पर्याय नाही. समाजातील प्रत्येक घटकाला माझी विनंती आहे. आपण वास्तव स्विकारायला हवं. जनतेच्या दृष्टीनं राज्य सरकार कठोर निर्णय घेत आहेत. त्यासाठी सर्वाचं सहकार्य अपेक्षित आहे,’ असं आवाहन शरद पवारांनी केलं आहे.

No comments:

Post a Comment