विनाकारण सायरन वाजवणाऱ्या रुग्णवाहिका चालकांवर कारवाई करा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, April 6, 2021

विनाकारण सायरन वाजवणाऱ्या रुग्णवाहिका चालकांवर कारवाई करा

 विनाकारण सायरन वाजवणाऱ्या रुग्णवाहिका चालकांवर कारवाई करा

मनसे शहराध्यक्ष वसिम राजे यांची मागणी
नगरी दवंडी

पारनेर:रुग्णवाहिकेत रुग्ण नसतानाही पारनेर शहरातील रस्त्यांववरुन सायरन वाजवत, वेगाने ये जा करणाऱ्या रुग्णवाहिका चालकांवर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष वसिम राजे यांनी केली आहे.राजे यांनी तश्या आशयाचे निवेदन पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांना दिले.बळप यांच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे यांनी निवेदन स्विकारले.

             निवेदनात म्हटले आहे की, गेल्या वर्षभरापासून करोना महमारीमुळे शहरवासीय धास्तावले आहेत.रुग्णवाहिकेच्या सायरनचा आवाज ऐकू आला तरी अनेकांना धडकी भरते.विशेषत: ह्रदयाशी संबंधित आजार असणाऱ्या व्यक्तींना  सायरनच्या आवाजाचा त्रास होत असल्याच्या तक्रारी गेल्या काही दिवसांपासून वाढल्या आहेत.

            सरकारी तसेच खासगी रुग्णवाहिका चालक अनेकदा रुग्णवाहिकेत रुग्ण नसतानाही विनाकारण शहरातील रस्त्यांवरून वेगाने ये जा करीत असल्याचे आढळते.ग्रामीण रुग्णालयात ते तहसील कार्यालय या वर्दळीच्या रस्त्यावरून जाताना रुग्णवाहिका चालक बेदरकारपणे रुग्णवाहिका चालवतात त्यामुळे या रस्त्यावर अपघातात होण्याची भिती राजे यांनी निवेदनात व्यक्त केली आहे.येत्या आठ दिवसांत रुग्णवाहिका चालकांच्या वर्तनात बदल झाला नाही तर पारनेर शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

विनाकारण सायरन वाजवणे योग्य नाही

प्रत्येक अर्धा तासाला रुग्ण उपचारासाठी घेऊन जाण्याइतपत शहरातील अथवा परिसरातील परिस्थिती बिघडलेली नाही.अपवादात्मक स्थितीत रुग्णवाहिकेत रुग्ण असेल व गरज असेल तर सायरन वाजवण्यास हरकत नाही.अश्या वेळी नागरिक मदतच करतात.मात्र रुग्णवाहिकेत रुग्ण नसतानाही पूर्ण वेळ सायरन वाजवत वेगाने जाणे योग्य नाही.

वसिम राजे, शहराध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना

रुग्णवाहिका चालकांना समज देणार

           रुग्णवाहिकेत रुग्ण नसतानाही सायरन वाजवत,वेग मर्यादेचे उल्लंघन करीत रुग्णवाहिका हाकणे योग्य नाही.पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व रुग्णवाहिका चालकांनी नियमाचे पालन करावे अशी लेखी समज त्यांना देण्यात येईल.त्यानंतरही चालकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल.

घनश्याम बळप, पोलीस निरीक्षक, पारनेर

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here