पालकमंत्री व आमदारांनी प्रत्येक तालुक्यात जंबो कोविड सेंटर उभारावे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, April 15, 2021

पालकमंत्री व आमदारांनी प्रत्येक तालुक्यात जंबो कोविड सेंटर उभारावे

 पालकमंत्री व आमदारांनी प्रत्येक तालुक्यात जंबो कोविड सेंटर उभारावे

मनसेचे डॉ.संतोष साळवे यांचे मुख्यमंत्रींना निवेदन


अहमदनगर ः
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या अत्यंत वेगाने वाढत असल्याची अत्यंत गंभीर असून यापुढच्या काळात कोरोना बाधित रुग्णांची संख्या अशीच वाढत गेली तर प्रत्येक शहरात भयावह स्थिती निर्माण होईल. ग्रामीण व शहरातील खाजगी रुग्णालयांमध्ये अनेक रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे आज शहरांमध्ये कोरोना रूग्णांसाठी आय.सी. यु, ऑक्सीजन बेड, व्हेंटिलेटर बेड रुग्णांसाठी कमी पडू लागले आहेत. पुढच्या काळामध्ये एकूण कोरोना रुग्ण संख्येच्या वेग पाहता बेडची संख्या वाढवावी लागेल. यासाठी जर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सर्व सोयीयुक्त कोविड सेंटर जर उभी करण्यात आली तर रुग्णांची जी धावपळ होते ती होणार नाही. जे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत त्यांना बेड मिळत नसल्यामुळे घरीच आयसोलेट होत असल्याने ते इतर व्यक्तीच्याही संपर्कात येतात. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. यासाठी राज्यातील सर्व पालकमंत्री व आमदार यांनी प्रत्येकी हजार ते दोन हजार क्षमतेचे मोफत कोविड सेंटर उभे करण्याच्या सूचना द्याव्यात. त्यामुळे करोना बाधितांना कोविड सेंटरमध्ये तात्काळ उपचार मिळाल्याने कोरोनाचा प्रसार कमी होण्यास मदत होईल. मोफत कोविड सेंटर उभी केल्यामुळे रुग्णांची खाजगी हॉस्पिटलमध्ये जी आर्थिक लूट केली जात आहे ती थांबेल व रुग्णांना आर्थिक दिलासाही मिळेल. त्यामुळे लवकरात लवकर या निवेदनाचा विचार करून ब्रेक द चैन ही खर्‍या अर्थाने साकार होण्यासाठी प्रत्तेक तालुका स्तरावर जंबो कोविड सेंटर त्वरित सुरु करावे, अशी मागणी मनसेचे डॉ.संतोष साळवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.

No comments:

Post a Comment