टाटा पॉवरच्या वतीने आरोग्य कर्मचार्‍यांना फेसमास्कचे वाटप. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, April 23, 2021

टाटा पॉवरच्या वतीने आरोग्य कर्मचार्‍यांना फेसमास्कचे वाटप.

टाटा पॉवरच्या वतीने आरोग्य कर्मचार्‍यांना फेसमास्कचे वाटप.

कोरोना महामारीत टाटा समूहाचा सामाजिक उपक्रम.


अहमदनगर -
टाटा समूह कोरोना महामारीत आपले योगदान देऊन सामाजिक उत्तरदायित्व निभावत आहे. या पार्श्‍वभूमीवर टाटा पॉवर कंपनीच्या खांडके-सुपा पवन उर्जा विभागाने ही खारीचा वाटा उचलत आरोग्य कर्मचार्‍यांना बचत गटाच्या महिलांनी बनवलेल्या चांगल्या दर्जाच्या फेसमास्कचे वाटप करण्यात आले.
केडगाव येथील महानगरपालिका कार्यक्षेत्रातील आरोग्य कर्मचार्‍यांना या फेसमास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी डॉ. दळवी, टाटा पॉवरचे सीएसआरचे अधिकारी विश्‍वास सोणवले, साईट हेड प्रवीण वाघ, आशा कर्मचारी, आरोग्य सेविका व मदतनीस उपस्थित होते.
डॉ. दळवी म्हणाले की, टाटा पॉवरने उपलब्ध करुन दिलेले फेसमास्क हे चांगल्या दर्जाचे असून, श्‍वास घेण्यासही सहजता आहे. दोन घड्यांच्या शिलाईमुळे सुरक्षितता व विषाणूपासून बचाव करण्यास नक्कीच मदत होणार असल्याचा विश्‍वास व्यक्त केला. विश्‍वास सोणवले यांनी गेल्या वर्षी ही टाटा पॉवर कंपनीच्या माध्यमातून कोरोना कालावधीत फेसमास्क, गरजूंना किराणा किटसह अन्नधान्याचे वाटप करुन, गावपातळीवर कोरोना प्रतिबंधात्मकतेसाठी जनजागृती करण्यात आली होती. शहरातून गावी परतलेल्या मजुरांसाठी उपजीविका कार्यक्रम हाती घेण्यात आला असल्याचे सांगितले. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेतही टाटा समूहाच्या धोरणानुसार सामाजिक बांधिलकी ठेऊन वेगवेगळे उपक्रम राबविणार असल्याची माहिती प्रवीण वाघ यांनी दिली.

No comments:

Post a Comment