वाळू तस्करांकडून हप्ते गोळा करणार्‍या ‘त्या’ पोलीसांची चौकशी करावी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, April 14, 2021

वाळू तस्करांकडून हप्ते गोळा करणार्‍या ‘त्या’ पोलीसांची चौकशी करावी

 वाळू तस्करांकडून हप्ते गोळा करणार्‍या ‘त्या’ पोलीसांची चौकशी करावी

अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्यावतीने पोलीस अधिक्षकांना निवेदन


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः अवैध वाळू उपसा करणार्या वाळू तस्करांकडून हप्ते गोळा करणार्या त्या पोलीसांची चौकशी करुन त्यांचे निलंबन करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.  
पारनेर तालुक्यातील अवैध वाळू उपसा बंद करण्यासाठी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्यावतीने अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही हा अवैध व्यवसाय बंद झालेला नाही. अवैध वाळू उपसा बंद होण्यासाठी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर येथील निवासस्थानी दि.22 एप्रिल रोजी पुकारण्यात आलेले आमरण उपोषण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आले आहे. सदर आंदोलन 22 जुलै रोजी करण्यात येणार आहे. मात्र या मिनी लॉकडाऊनमध्ये देखील पारनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरु असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
 जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील व पारनेर पोलीस स्टेशन येथील पोलीस कर्मचारी या वाळू तस्करांकडून हप्ते गोळा करीत आहे. दर दोन दिवसाला पोलीस अधीक्षक कार्यालयातील तो कर्मचारी पारनेरला येऊन स्थानिक पोलीसाला बरोबर घेऊन वाळू तस्करांकडून हप्ते घेत असल्याचा आरोप रोडे यांनी केला आहे. सदर कर्मचार्यांचे सीडीआर मोबाईल लोकेशन व मोबाईल संभाषण तपासून चौकशी करावी, वाळू तस्करांकडून हप्ते गोळा करणार्या सदर पोलीस कर्मचार्यांवर  कारवाई करुन त्यांचे निलंबन करण्याची मागणी करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment