पदाच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचे काम करतील संभाजी कदम - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, April 10, 2021

पदाच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचे काम करतील संभाजी कदम

 पदाच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचे काम करतील - संभाजी कदम

शिवसेनेच्यावतीने प्रदिप पंजाबी व राकेश गुप्ता यांचा सत्कार


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः पंजाबी समाज नगरमध्ये मोठ्या प्रमाणात असून, त्यांनी संघटनेच्या माध्यमातून समाजाचे उत्कृष्टपणे संघटन करुन समाजाचे प्रश्न सोडविले आहेत. दुसर्यांना मदत करण्याचा स्वाभाविक गुण सर्वांमध्ये असल्याने ते नगरच्या मातीशी एकरुप झालेले आहेत. नगरमधील अनेक सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, व्यापार-उद्योग  कार्यात मोठे योगदान दिलेले आहे. गेल्या वर्षभरापासून कोरोना प्रादुर्भावामुळे नगरकरांसाठी सर्वप्रकारची मदत करुन मोठे सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतला आहे, तो कौतुकास्पद असाच आहे. समाजाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांमुळे समाजाला मोठा फायदा होत आहे. प्रदीप पंजाबी व राकेश गुप्ता हे सामाजिक कार्यात नेहमीच सक्रिय असतात त्यामुळे त्यांची अध्यक्षपदी निवड झाली ही त्यांच्या कार्याची पावती आहे. यापुढील काळातही समाजाचे प्रतिनिधीत्व करुन समाजाला दिशा देण्याचे काम करतील. त्यांच्या कार्यात शिवसेनेचेही सहकार्य राहिल, असे प्रतिपादन  माजी शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम यांनी केले.
पंजाबी समाजच्या अध्यक्षपदी प्रदिप पंजाबी यांची तर सर्जेपुरा येथील राधाकृष्ण मंदिर  ट्रस्टच्या अध्यक्षपदी राकेश गुप्ता यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा शिवसेनेच्यावतीने सत्कार करण्यात आले. यावेळी माजी शहरप्रमुख संभाजी कदम, माजी नगरसेवक सुरेश तिवारी,  माजी नगरसेवक अशोक दहिफळे, नगरसेवक योगिराज गाडे, सनी आहुजा, सावन चाबर, मोहित पंजाबी, यश दुप्पड, पुनीत भूतानी,  हितेश ओबेरॉय, अनिश अहुजा, निखिल नहार, शैलेश चोपडा, संजय दुप्पड, विवेक गुप्ता, अंगद मदन, सुनील ओबेरॉय, अमित सहानी, प्रमोद चड्डा, अशोक गुप्ता  उपस्थित होते.
याप्रसंगी प्रदीप पंजाबी म्हणाले, आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजाचे आपण देणे लागत असतो. आपल्या वैयक्तिक कामाबरोबरच सामाजिक कार्यातही आपण सहभागी झाले पाहिजे. समाजातील वंचितांना बरोबर घेऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम सर्वांनी एकत्रित करावयाचे आहे. यासाठी सर्वांचे पाठबळ मिळत असल्याने आपणास काम करण्यास प्रेरणा मिळत आहे. शिवसेनेच्यावतीने आमचा सत्कार करुन आमच्या सर्वांच्या कार्याचा एकप्रकारे गौरव केला आहे. यापुढील काळातही आपण समाजातील सर्व घटकांच्या उन्नत्तीसाठी योगदान देऊ, असे सांगितले. याप्रसंगी सुरेश तिवारी, योगिराज गाडे आदिंनी मनोगतातून अजय पंजाबी व राकेश गुप्ता यांच्या कार्याचा गौरव केला. सूत्रसंचालन अशोक दहिफळे यांनी केले तर सनी आहुजा यांनी सर्वांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment