ऑक्सिजन संपत आल्याने नगर शहरात डॉक्टर हतबल, जिल्हा रुग्णालयातून ऑक्सिजनचा पुरवठा.... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, April 20, 2021

ऑक्सिजन संपत आल्याने नगर शहरात डॉक्टर हतबल, जिल्हा रुग्णालयातून ऑक्सिजनचा पुरवठा....

 ऑक्सिजन संपत आल्याने नगर शहरात डॉक्टर हतबल, जिल्हा रुग्णालयातून ऑक्सिजनचा पुरवठा....नगरी दवंडी

अहमदनगर : शहरातील खासगी रुग्णालयाकडे असलेला ऑक्सिजनचा साठा संपत आला आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयातील डॉक्टर हतबल झाले असून डॉक्टरांनी रुग्णांच्या नातेवाईकांना या परिस्थितीची स्पष्ट कल्पना देण्यास सुरुवात केली आहे. ऑक्सिजन नसेल तर उपचार कसे होणार ? असा सवाल करत ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची मागणी खासगी डॉक्टर प्रशासनाकडे करीत आहेत. 

नगर शहरातील खासगी रुग्णालयाना ऑक्सिजनचा पुरवठा कमी प्रमाणात होत आहे, तर ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. रेमडेसिविर इंजेक्शन तर मिळत नाहीतच, पण ऑक्सिजन विक्रेत्यांकडून आता ऑक्सिजनचा पुरवठाही थांबला आहे. काही तास पुरेल एवढाच ऑक्सिजन काही रुग्णालयात आहे. ऑक्सिजन संपला तर रुग्णांवर उपचार करता येणे शक्य होणार नाही, अशी हतबलता काही हॉस्पिटलने रुग्णांच्या नातेवाईकांना बोलून दाखवली.  

शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात ऑक्सिजनची 50 टनाची गरज असताना फक्त 22 टनच ऑक्सिजन मिळत आहे. जो काल परवा मिळत होता तोही ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाला आहे. त्यामुळे रुग्णांचा जीव टांगणीला लागल्याने डॉक्टर चिंतेत आहेत.

दुसरीकडे ऑक्सिजन पुरवठयाबाबत प्रशासनाने समन्यायी वाटपासाठी समिती नियुक्त केली आहे. पण ऑक्सिजनचा पुरवठाच नाही तर वाटप कशाचे करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.


जिल्हा रुग्णालयातील ड्युरा ऑक्सिजन सिलिंडरमधून नगरमधील काही खासगी रुग्णालयाना ऑक्सिजनचा तात्पुरता पुरवठा करण्यात येत आहे.

- संदिप निचित 

निवासी उपजिल्हाधिकारी

No comments:

Post a Comment