माका परिसरातील गर्दी कमी करण्यास सोनई ठाणे सज्ज. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Sunday, April 25, 2021

माका परिसरातील गर्दी कमी करण्यास सोनई ठाणे सज्ज.

 माका परिसरातील गर्दी कमी करण्यास सोनई ठाणे सज्ज.

नगरी दवंडी

नेवासा - नेवासे तालुक्यातील शेवगाव _पांढरीपुल रस्त्यावरील,पाथर्डी शेवगाव नेवासा या तिन तालुक्यातील सिमेलगत  महत्वाची बाजारपेठ म्हणुन ओळख असलेल्या माका परिसरातील कोरोना बाबतीत गर्दी काही केल्या कमी होईना याबाबत या अगोदर वृत्तपत्रांतुन बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर नेवासे तालाक्यातील सोनई पोलिस ठाण्याचे स.पो.नी.रामचंद्र कर्पे,तसेच थोरात यांनी आक्रमक भुमीका घेत,गर्दी कमी करण्यासाठी चोख भुमिका बजावण्याचे काम सुरु केले असल्याचे दिसून येते आहे.                                   याबाबत असे की,हा परिसर दोन ते तिन तालुक्याच्या सिमेलगत असल्याने,कोरोना साथीबाबतीत गांभीर्य न बाळगता कायमचं विनाकारण फिरणे,टोळी करून बसणे,मटका,जुगार,तिरटं,सोरटं नावाचा खेळ, गुटखा मावा विक्री,जेवणाच्या नावाखाली धाबे,हाॅटेलमध्ये मागच्या दाराने बेकायदा दारु विक्री, शिवाय यात दारु नकली असल्याबाबतीत चर्चा तसेच कायमचं गर्दी होत असल्याबाबतीत चर्चा,लक्षात घेता नेवासे तालुक्यातील सोनई पोलिस ठाण्याने गर्दी कमी करण्यात तसेच बेकायदा व्यवसायासंदर्भात आक्रमक भुमीका घेतल्याने परिसरातील बेकायदा व्यवसायीकांचे  धाबे दणाणले असुन,यासंदर्भात पोलिसी खाक्या संबधितांना दाखवत आपल्या कामाची पावती दिल्याचे पहावयास मिळत आहे.                                                                               याबाबत कोरोना साथीसंदर्भात आपल्या पद्धतीने संबधित पोलिस ठाणे सोनईचे स.पो. नी.रामचंद्र कर्पे,स.पो.नी.थोरात,कर्मचारी दहिफळे, वाघमोडे,ठोंबरे, आघाव,मुळे,माने,तसेच इतर सहकारी महत्वाची भुमिका बजावत असल्याचेही सोनई परिसरा सह बोलले जात आहे.या घटनेमुळे काही बेकायदा व्यावसायीकांकडुन कोरोनासाथीचे गांभीर्य लक्षात न घेता,कर्तव्यदक्ष पोलिस प्रशासन,पत्रकार बांधवांबद्दल तसेच स्थानिक प्रशासना बद्दल अपशब्द उदगारण्याचे धाडसही केले जात असल्याचे सध्यातरी बोलले जात आहे.

No comments:

Post a Comment