सोनईचे स.पो.नि.कर्पे यांचेकडुन समज देवुन कारवाई. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, April 23, 2021

सोनईचे स.पो.नि.कर्पे यांचेकडुन समज देवुन कारवाई.

 सोनईचे स.पो.नि.कर्पे यांचेकडुन समज देवुन कारवाई.नगरी दवंडी

माका प्रतिनिधी_ नेवासे तालुक्यातील माका परिसरात  कोरोनाच्या वाढत्या कहरास न जुमानता सातत्याने गर्दी, मिनीबाजार,विनाकारण टोळी करून दिवसभर बसणारे, मोकाट फिरणारे दुचाकीस्वार तसेच अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यावसायिकांना सोनई पोलिस ठाण्याचे कर्तव्यदक्ष स.पो.नी.रामचंद्र कर्पे यांचेकडुन आपल्या पथका समवेत कोरोनाच्या वाढत्या कहराबाबत समज देवुन काहींवरती कारवाई करण्यात आली.                               

 याबाबत असे की,याअगोदर माका परिसरातील गर्दी काही केल्या कमी होईनाच अशा बातम्याही वृत्त पत्रातून प्रसिद्ध झाल्या होत्या.याबाबतीत दखल घेत या परिसरात वेळोवेळी पोलिस प्रशासन गर्दी कमी करण्यात कारवाई करत चोख भुमिका बजावत असल्याचे दिसून येत आहे.यासंदर्भात स्थानिक ग्रामपंचायत माध्यमातून तसेच आपत्ती व्यवस्थापन समितीकडुन कोरोनाबाबतीत हलगर्जीपणा होत असल्याचे दिसून आले आहे.                                

कोरोना साथीबाबत आढावा घेत,कर्पे यांनी अत्यावश्यक सेवा दुकानधारकांनी कोरोना टेस्ट करूनच सकाळी11वाजेपर्यंतच आपली दुकाने चालवावीत तसेच इतर दुकाने बंद ठेवण्याबाबत सुचना करुन कोरोना साथीच्या उपाययोजना बाबतीत दूरध्वनिद्वारे माका ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक निमसे तसेच पत्रकार दत्तात्रय शिंदे यांचेशी चर्चाही केली.याप्रसंगी त्यांच्या समवेत पथकात पो.काॅ.बाबा वाघमोडे,पो.काॅ.आदीनाथ मुळे, पो.काॅ.शिवाजी माने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here