पतीकडून पत्नीचा गळा आवळून खून. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, April 6, 2021

पतीकडून पत्नीचा गळा आवळून खून.

 पतीकडून पत्नीचा गळा आवळून खून.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः घरगुती कारणातून वादात पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेत लता संतोष पटोरकर असे मयत महिलेचे नाव आहे. तर संतोष परसराम पटोरकर (वय.28 वर्षे.रा.बिबामल ता. धारनी जि.अमरावती) असे आरोपी पतीचे नाव आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, नगर एमआयडीसी येथील ब्रीज इंडस्ट्रीज प्लाँट नं डी.15, सिक्युरीटी कँबीनमध्ये शनिवारी (दि.3 एप्रिल) राञी 11 वाजण्याच्या नंतर रविवारी (दि.4 एप्रिल) दरम्यान आरोपी संतोष परसराम पटोरकर याने त्यांचे घरगुती अगर वैयक्तीक कारणावरुन त्याची पत्नी लता संतोष पटोरकर हीचा कशानेतरी गळा आवळून तिला जीवंत ठार मारले आहे.या भागीनाथ सुर्यभान कराळे (रा.डेंन्टल काँलेज शेजारी धुमाळ माथा वडगाव गुप्ता ता.जि.अ.नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील अधिक तपास एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सपोनि आठरे हे करीत आहेत.

No comments:

Post a Comment