प्रा. कुंदा कवडे - पाचर्णे यांना पीएच .डी. पदवी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, April 24, 2021

प्रा. कुंदा कवडे - पाचर्णे यांना पीएच .डी. पदवी

 आळकुटी महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख

प्रा. कुंदा कवडे - पाचर्णे यांना पीएच .डी. पदवी



नगरी दवंडी

 पारनेर प्रतिनिधी 

          प्रवरा  ग्रामीण शिक्षण संस्थेचे , लोकनेते डॉ.बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने  सन्मानित) आटर्स  कॉर्मस व विज्ञान महाविद्यालय अळकुटी येथील मराठी विभागप्रमुख तसेच पेमराज सारडा महाविद्यालय अहमदनगर येथील मराठी विभाग पदव्युत्तर संशोधन केंद्रातील विद्यार्थिनी प्रा. कुंदा कवडे यांनी मराठी विषयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पीएच .डी पदवी प्राप्त केली. त्यांना सारडा महाविद्यालयातील संशोधन केंद्रातील समन्वयक  डॉ .माहेश्वरी गावित यांचे मार्गदर्शन लाभले .  "इ.स. १९८० ते २०१५ या कालखंडातील आदिवासी चरित्रांचा अभ्यास"या विषयावर  कुंदा कवडे यांनी पुणे विद्यापीठात प्रबंध सादर केला होता .

त्यांच्या या यशाबद्दल प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक मा. ना. राधाकृष्ण विखे पाटील, नगर दक्षिणचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेचे सचिव श्री. भारत घोगरे, स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ.भास्करराव शिरोळे, अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. संदिप सांगळे,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पारखे,   प्रा.चाटे  सर्व प्राध्यापक, सेवकवर्ग आदींनी कुंदा कवडे यांचे हार्दिक अभिनंदन केले. तसेच परिसरातूनही त्यांचे कौतुक होत आहे. कुंदा कवडे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन संघर्ष करत अनेक समस्यांना तोंड देत हे यश मिळविले आहे  ते  अभिमानास्पदच आहे .

No comments:

Post a Comment