कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर निमगाव वाघात साध्या पध्दतीने हनुमान जयंती साजरी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, April 28, 2021

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर निमगाव वाघात साध्या पध्दतीने हनुमान जयंती साजरी

 कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर निमगाव वाघात साध्या पध्दतीने हनुमान जयंती साजरी

सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द करुन घरोघरी विधीवत पूजा



अहमदनगर(प्रतिनिधी)- कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर निमगाव वाघा (ता. नगर) येथे हनुमान जयंती साध्या पध्दतीने साजरी करण्यात आली. मारुती मंदिरात पहाटे मोजक्या ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये विधीवत पूजा करण्यात आली. तर गावातील ग्रामस्थांनी घरोघरी मनोभावे हनुमानजींची उपासना केली. तसेच कोरोनाचे संकट टळून निरोगी व सदृढ आरोग्यासाठी हनुमान चरणी प्रार्थना करण्यात आली.

गावातील मारुती मंदिरात पूजा झाल्यानंतर, स्व.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने व्यायाम शाळेत व परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, पै. गणेश फलके, युवा मंडळाचे अध्यक्ष पै.संदिप डोंगरे, विठ्ठल फलके, जालिंदर आतकर, विशाल गावडे, तुकाराम पवार, विष्णू शिंदे, मंदा डोंगरे, राष्ट्रीय कुस्तीपटू प्रतिभा डोंगरे, प्रियंका डोंगरे, कोंडीभाऊ फलके, पिंटू जाधव उपस्थित होते. हनुमानजींच्या आराधनेने कोरोनाशी लढण्यासाठी बळ मिळणार आहे. ग्रामस्थांनी देखील आपल्या आरोग्याची काळजी घेऊन नियमांचे पालन करण्याचे आवाहन पै. नाना डोंगरे यांनी केले.

No comments:

Post a Comment