रेमडेसिवीर’चा तुटवडा भासू देणार नाही ः गणेश शेळके - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, April 17, 2021

रेमडेसिवीर’चा तुटवडा भासू देणार नाही ः गणेश शेळके

 रेमडेसिवीर’चा तुटवडा भासू देणार नाही ः गणेश शेळके


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अत्यवस्थ रुग्णांच्या नातेवाइकांना रेमडेसिव्हिर इंजेक्शनसाठी धावपळ करावी लागत आहे. ही बाब पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके यांनी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली होती. डॉ. विखे यांनी काही इंजेक्शन उपलब्ध करून दिली, तसेच इंजेक्शनची कमतरता भासू देणार नसल्याचे आश्वासन दिले.
तालुक्यात भाळवणी व पिंपळगावरोठा येथे खंडोबा देवस्थानच्या वतीने मोफत कोरोना सेंटर चालविले जात आहे. पारनेर, सुपे येथे खासगी कोरोना सेंटर चालविले जात आहेत. तालुक्यातील सुमारे पाचशेच्या वर रुग्ण तेथे उपचार घेत आहेत. काही जण होम क्वारंटाईन आहेत. तालुक्यात नियम न पाळल्यास कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यातच अनेकांकडून कोरोना रुग्णांची माहिती लपविली जाते आहे. त्यामुळे तालुक्यातील बाधितांचा निश्चित आकडा समजू शकलेला नाही.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here