कायगाव टोका येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सोशल डिस्टसिंगचा उडाला पूर्णपणे फज्जा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, April 30, 2021

कायगाव टोका येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सोशल डिस्टसिंगचा उडाला पूर्णपणे फज्जा

 कायगाव टोका येथील प्राथमिक   आरोग्य केंद्रात सोशल  डिस्टसिंगचा उडाला  पूर्णपणे फज्जा नगरी दवंडी 

नेवासा -  महाराष्ट्र राज्यातील तसेच नेवासा तालुक्यातील कोरोना या आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने अनेक कडक निर्बंध जारी केले आहेत .ज्यामध्ये मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन करणे अशा अनेक गोष्टी सक्तीच्या केल्या आहेत .परंतु कायगाव टोका येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आज कोरोणा लस घेण्याकरता नागरिकांची एकच झुंबड उडाली आणि बघता बघता तुडुंब गर्दी झाली या गर्दीवर प्राथमिक आरोग्य केंद्रांतील अधिकारी आणि कर्मचारी  नियंत्रण ठेवू शकले नाह।  त्यामुळे  कोरोना या आजाराची साखळी तुटणार का?  आणि ब्रेक द चेन  हा उपक्रम  सफल होणार का? असा प्रश्न तेथे कोरोना लस घेण्याकरता गेलेले सिने अभिनेते चंद्रशेखर कडू पाटील यांनी यावेळी केला.

No comments:

Post a Comment