पिंपळगाव तुर्कचा भूमिपुत्र भानुदास शिंदे मुंबईत कोव्हिड योद्धा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, April 26, 2021

पिंपळगाव तुर्कचा भूमिपुत्र भानुदास शिंदे मुंबईत कोव्हिड योद्धा

 पिंपळगाव तुर्कचा भूमिपुत्र भानुदास शिंदे मुंबईत कोव्हिड योद्धा 

(कोरोनात पोलिसांना सामजिक बांधिलकीतुन मदत)



नगरी दवंडी

पारनेर प्रतिनिधी

तालुक्यातील पिंपळगांव तुर्क या गावचे भूषण असलेले व आपल्या सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे श्री.भानुदास चंद्रभान शिंदे हे तंत्रस्नेही शिक्षक असून जीवावर उदार होऊन आर.एस.पी अधिकारी तथा कोरोना योद्धा म्हणून मुंबईतील नवघर पोलीस ठाणे मुलुंड येथे कोरोनाच्या दुसऱ्या लाटीमध्ये पुन्हा सेवा देत आहेत.शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना सुट्टी असल्याने घरी न राहता आर.एस.पी युनिटचे पितामह श्री.अरविंद देशमुख , कमांडर श्री. मणीलाल शिंपी व समादेशक श्री. केशव  मालुंजकर यांच्या प्रेरणेने प्रशासनाला सहकार्य करण्याच्या उदात्त हेतूने पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून दिवसभर उन्हातान्हात ते सेवा करीत आहेत.अनेक सामाजिक/शैक्षणिक संस्थांनी श्री. भानुदास शिंदे यांना व त्यांच्या कार्याला कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित केले. त्यांच्या या सामाजिक भावनेचे व पुरस्काराचे श्रेय त्यांनी आपली आई व पत्नीस दिले.महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे राज्य सहसचिव म्हणून देखील ते जबाबदारी पार पाडत आहेत. शाळा बंद आहेत परंतु शिक्षण सुरू अश्या परिस्थितीत ezeetest च्या माध्यमातून त्यांनी राज्य कार्याध्यक्ष श्री. ज्ञानदेव हांडे  व प्रदेशाध्यक्ष श्री. मनोहर कदम  यांच्या मदतीने विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण कसे दयावे ? याचे प्रशिक्षण आयोजित करून हजारो शिक्षकांना तंत्रस्नेही बनविले.शिक्षक हा देशातील नागरिक घडविण्याचे काम करतो यासोबतच देशावर आलेले कोरोनाचे संकट व इतर आपत्कालीन परिस्थितीमध्ये विविध कामे करून समाजापुढे एक आदर्श निर्माण करतो हे आर.एस पी शिक्षक अधिकाऱ्यांच्या कार्यातून श्री.भानुदास चंद्रभान शिंदे यांनी दाखवून दिले आहे. सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक अशा विविध स्तरांतून त्यांच्यावर  कौतुकाचा वर्षाव होत आहे. अहमदनगर मधील पारनेरचे हे व्यक्तिमत्त्व सामजिक भावनेने काम करत असल्याने देखील त्यांचे कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment