बँकेच्या कामकाजासाठी आलेल्या खातेदारांना होतोय मनस्ताप.... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, April 19, 2021

बँकेच्या कामकाजासाठी आलेल्या खातेदारांना होतोय मनस्ताप....

 बँकेच्या कामकाजासाठी आलेल्या खातेदारांना होतोय मनस्ताप....




नगरी दवंडी

जामखेड  - महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी शहरातील सर्व बॅंकांचे कामकाज कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करत सुरू होते पण पण स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जामखेड शाखेचे कामकाज मात्र बंद होते बॅंकेच्या बाहेर आज जनता कर्फ्यू असल्याने कामकाज बंद राहिल असा बोर्ड लावला होता. त्यामुळे बाहेर गावाहून बॅंकेच्या कामकाजासाठी आलेल्या लोकांना रिकाम्या हाताने परत जावे लागले. शहरातील सर्व बॅंका सुरू आसताना फक्त स्टेट बँक का बंद असा प्रश्न खातेदार करत होते.

       महिन्यांच्या पहिल्या व तिसऱ्या शनिवारी बॅंकांचे कामकाज सुरू असते. दिनांक १४ एप्रिल सायंकाळी आठ वाजल्यापासून ३० एप्रिल पर्यंत राज्यात लाॅकडाउन सुरू आहे. यात अत्यावश्यक सेवा वगळून बाकी व्यवहार बंद आहेत. शनिवारी व रविवारी जनता कर्फ्यू असते यात दवाखाने, बॅंका व मेडिकल सुरू राहतील असे आहे. पण शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया जामखेड शाखा तिसरा शनिवार आसतानाही कामकाज बंद ठेवल्याने अनेक लोकांची अडचण निर्माण झाली रिकाम्या हाताने लोकांना परत जावे लागले. बाकी सर्व बॅंका सुरू होत्या फक्त स्टेट बँक ऑफ इंडिया जामखेड शाखा कामकाज बंद होते.

       शनिवार जनता कर्फ्यू मुळे कामकाज बंद राहिल असा फलक बॅंकेच्या बाहेर लावण्यात आला होता इतर बॅंकांचे कामकाज मात्र कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करत कामकाज सुरू होते. एकतर स्टेट बॅंकेत मोठ्या प्रमाणावर गर्दी असते अनेक लोकांच्या तक्रारी आहेत. लोकांना सेवा व्यवस्थित मिळत नाही. बॅक कर्मचारी सहकार्य करत नाहीत. वयोवृद्ध, पेन्शन धारक यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. तीन चार महिने आधार लिंक व केवायसी होत नाही. यातच शहरातील सर्व बॅंका सुरू आसताना हि बॅक बंद ठेवल्याने सोमवारी जास्त गर्दी होणार आहे.

बॅक बंद असल्यामुळे लोकांना खुपच मनस्ताप सहन करावा लागला आहे. बॅक बंद ठेवणार्‍या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहेत.

No comments:

Post a Comment