जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी अचानक जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन प्लॅंटची पाहणी केली - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, April 23, 2021

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी अचानक जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन प्लॅंटची पाहणी केली

  जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी अचानक जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन प्लॅंटची पाहणी केली 

नाशिक ऑक्सिजन दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्हाधिकाऱ्यांनी केली जिल्हा रुग्णालयाची पाहणीअहमदनगर -
नाशिक मधील ऑक्सिजन लिकेजमुळे झालेल्या दुर्घटनेतून धडा घेत, पुन्हा अशा प्रकारच्या दुर्घटना होऊ नये व निष्पाप रुग्णांचा जीव जाऊ नये, म्हणून इतर जिल्ह्यातही खबरदारी घेतली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी अचानक जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन प्लँटची पाहणी केली आहे. यावेळी पोलीस, महसूल, अग्निशमन दलाचे वरीष्ठ अधिकारीही उपस्थित होते. यावेळी त्यांनी जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांट किती सुरक्षित आहे? दुरुस्ती-देखभाल, वॉर्डबॉयना प्रशिक्षण आदींची माहिती घेतली. या प्रकारच्या दुर्घटना यापुढे होता कामा नये यासाठी त्यांनी जिल्हा रुग्णालयाला सूचना केल्या आहेत. 
जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी विविध विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना सोबत घेऊन अचानक जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन टॅन्कची पाहणी केली. हे मॉकड्रिल असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी अग्निशमन दलाचे अधिकारी व तंत्रज्ञ यांनी अचानक काही अघटित परस्थिती उद्भवली, तर त्याला कसे सामोरे जायचे याचा डेमो दिला. जिल्हाधिकार्‍यांनी यावेळी जिल्हा रुग्णालयातील वॉर्डबॉय यांना प्रशिक्षण देण्यासंदर्भात सूचना केल्या आहेत.


.

No comments:

Post a Comment