जिल्हा दौऱ्यात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना या ठिकाणी काळे झेंडे दाखवून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, April 29, 2021

जिल्हा दौऱ्यात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना या ठिकाणी काळे झेंडे दाखवून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणार

 जिल्हा दौऱ्यात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना  या ठिकाणी काळे झेंडे दाखवून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणार
नगरी दवंडी

नेवासा(प्रतिनिधी)अहमदनगर जिल्हा दौऱ्यात जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ हे शुक्रवारी दि.३० एप्रिल रोजी दुपारी नेवासा येथे येत असून कोरोनाच्या कठीण प्रसंगी लोकांचा जीव जात असतांना ते उशिरा का आले असा सवाल करून त्यांना काळे झेंडे दाखवून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणार असल्याची माहिती वंचीत बहुजन आघाडीचे नेते व शिर्डी लोकसभा मतदार संघाचे उमेदवार संजय सुखदान यांनी दिली.

पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या दौऱ्यांबाबत बोलतांना संजय सुखदान म्हणाले की महाराष्ट्राबरोबरच

जिल्ह्यात कोविड रुग्णांची अवस्था दयनिय अशी आहे ऑक्सिजन व बेडची समस्या मोठ्या प्रमाणात उदभवत असतांना शासनाच्या वतीने जिल्ह्यासह तालुक्यामध्ये युद्धपातळीवर प्रयत्न होणे गरजेचे होते.पालक मंत्री हे नगर जिल्ह्याचे पालक आहेत,एका पालकांचे काम असते की आपल्या पाल्याचे नीटनेटके संगोपन करणे, परंतु हे जसे पालकमंत्री झाले तसे इकडे फिरकले सुद्धा नाहीत आणि कोविड परिस्थितीमध्ये तर कहरच झाला ,नेवासा तालुक्यासह जिल्ह्यात सर्वत्र कोरोना ने अनेक जण ऑक्सिजन, रेमडीसीविर , हॉस्पिटलमध्ये बेड न मिळणे या गोष्टी मुळे मृत्यू झालेले आहे, तसेच गेल्या

आठवडाभरा पासून नेवासा तालुका सह जिल्हाभरात कोविड चाचणी साठीकुठे ही अँटीजन किट ही उपलब्ध नाही परिणामी रुग्ण उपचारविना मरत आहेत ,तसेच लस ही शिल्लक नाही अशी गंभीर परिस्थिती निर्माण झालेली असतांना कोविड रुग्णांना उपचार न मिळाल्याने मृत्यू आलेला आहे ना.हसन मुश्रीफ यांनी पालक या नात्याने कोविड रुग्णांचे संगोपन झाले नाही,

या सर्व गोष्टींचा विचार करून आपण आमचे पाल्य म्हणून आपल्या सदसदविवेकबुद्धीला स्मरून पालकमंत्री पदाचा राजीनामा द्यावा व उगाच जिल्ह्यात आढावा बैठकीच्या बातम्या प्रसारित करण्यासाठी व प्रसिद्धी बिनकामाची आढावा बैठक नेवासा येथे ही घेऊ नये।अन्यथा आपला काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात येईल असा ईशारा संजय सुखदान यांनी काढलेल्या निवेदनात दिला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here